National Book Trust | नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे : नॅशनल बुक ट्रस्टचे (National Book Trust) कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार असून त्यांना मनपाची एका इमारतीची जागा देखील तात्काळ भाड्याने दिली आहे. त्यामुळे आता केवळ पुणे पुस्तक मोहत्सव पुरते काम होणार नसून वर्षभर एनबीटी काम होणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे याबाबत आता त्याची माहिती सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी एक फिल्म तयार करून मोहत्सवत दाखवण्यात यावे. मुलांसाठी चित्रपट मोहत्सव सोबत एक पुस्तक आधारित नाटक बसवण्यात यावे. पुस्तकाची आवड त्यातून मुलांमध्ये निर्माण होईल. पुणे शहर हे विविध क्षेत्रात अग्रेसर झाले आहे त्यामुळे पुणे पुस्तक मोहत्सव देखील यशस्वी होईल असे मत माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने यावर्षीच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. पुस्तक महोत्सवाचे कार्यालयाचे उद्घाटन आणि मांडवाचे भूमिपूजन माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरवारी करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे , खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू पराग काळकर, एनबीटी संचालक युवराज मलिक, अध्यक्ष मिलिंद मराठे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डीक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डीईएस अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अशोक पलांडे, जेष्ठ संपादक किरण ठाकूर, भाजप नेते माधव भंडारी, खासदार मेधा कुलकर्णी, युवा सेना नेते किरण साळी, कुमार शंकर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, फर्ग्युसन महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय तडके, आरपीआय नेते मंदार जोशी, सुशील जाधव उपस्थित होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे अनेक शैक्षणिक संस्था आहे. पुणे पुस्तक मोहत्सव यंदा मोठ्या प्रमाणात होईल. मुलांना चित्रपट मोहत्सव सोबत मुलांसाठी कथाकथन आणि पुस्तक वाचन कट्टा निर्माण करण्यात यावा. मला अभिमान आहे की, पुण्यात हा ऐतिहासिक मोहत्सव होत असल्याचा अभिमान आहे.

राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा मोहत्सव कोण एका व्यक्ती चा नाही तर पुणेकर यांचा आहे. लोकसहभाग यामध्ये महत्वाचा आहे. यावर्षी चार विश्व विक्रम यंदा होणार असून चीनचे विक्रम मोडीत कडण्यात येणार आहे. साडेसात लाख लोक मोहत्सवला यंदा भेट देतील अशी अपेक्षा आहे.अनेक व्यक्तींचा हा मोहत्सव आयोजन मध्ये सहभाग आहे. यावेळी पुणे पुस्तक मोहत्सव मध्ये ५९८ स्टॉल राहणार असून ही क्षमता तीन दिवसात भरून आणखी ८० जण स्टॉल मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. साडेअकरा कोटीची मागील वेळी पुस्तक विक्री झाली यंदा ती दुप्पट होईल. परदेशातील लेखक देखील यंदा सहभागी होणार आहे. यंदा देखील एक लाख पुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ यादरम्यान शांतता पुणेकर पुस्तक वाचत आहे उपक्रम राबवला जाणार आहे.

युवराज मलिक म्हणाले, पुणे शहरात साहित्य बद्दल जागरूकता आहे. मागील वेळी पुस्तक मोहत्सव मध्ये २०० स्टॉल होते यंदा त्याची संख्या तिप्पट वाढवून ६०० झालो तरी देखील अनेकजण विचारणा करत आहे. देशातील एक क्रमांकाचा हा मोहत्सव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील वेळी हा मोहत्सव परदेशात घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. मोहत्सवात देशभरातील अनेक प्रतिष्ठित लेखक येऊन विविध भाषांत त्यांचे मत लिटरेचर फेस्टिवल मध्ये मांडतील. जगातील बालक यांच्यासाठी प्रसिद्ध चित्रपट दाखवण्यात येणार आहे. फूड फेस्टिवल देखील यंदा असणार आहे. मराठी भाषा अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे आता मराठी पुस्तके इतर भाषांत मोठ्या प्रमाणात भाषांतरित करण्यात येतील. मराठी भाषा विभाग सक्षम करण्यात येतील. पुण्यातील नवीन कार्यालयात नोकरदार महिला कामावर जातील त्यावेळी त्यांची मुले आमच्या केंद्रात सोडतील आम्ही त्यांना पुस्तक वाचन माध्यमातून सुसंस्कृत करू, मोफत लायब्ररी, मोफत पुस्तक वाचन जागा, स्टोरीटेलिंग उपक्रम , पुणे पुस्तक मोहत्सव आणि एनबीटी यांची दोन स्वतंत्र कार्यालय असणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकने यांनी केले, प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी