Senior BJP MLA | भाजपच्या नवीन नियमाने ज्येष्ठ आमदारांचे पत्ते कट होणार, आमदारांमध्ये धाकधूक वाढली
मुंबई: Senior BJP MLA | मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? (Who Will Next CM Of Maharashtra) यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुती नेत्यांची (Mahayuti Leaders) बैठक पार पडणार आहे. ही बैठक शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. शहांच्या भेटीसाठी अजित पवार (Ajit Pawar) सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साडेतीन वाजता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ४:०० वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
दरम्यान नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट करून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावांवर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे आज सकाळपासून सागर बंगल्यावर आमदारांची रिघ पाहायला मिळत आहे.
अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात युवा आमदारांना जास्त संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी आतापासून तयारी केली जाणार आहे. त्यामुळे ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी