Sharad Pawar NCP | शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम वर शंका, ईव्हीएम पडताळणीसाठी केले अर्ज दाखल
अहिल्यानगर: Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीत (MH Assembly Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर मविआला मोठा फटका बसला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ईव्हीएम (EVM) वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन पराभूत उमेदवारांनी अनामत रक्कम भरुन ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. (Sharad Pawar NCP)
राहुरी विधानसभा (Rahuri Assembly) मतदारसंघातील शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) आणि कोपरगाव विधानसभेचे (Kopargaon Assembly) पराभुत उमेदवार संदीप वर्पे (Sandeep Varpe) यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे ईव्हीएम पडताळीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतील ५ केंद्र तर वर्पे यांनी कोपरगावातील एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहेत. एका मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये शुल्क भरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या ईव्हीएमविरोधातील तक्रारी संदर्भात कायदेशीर कारवाईसाठी वकिलांची एक टीम करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी