Pune Weather Updates | पुण्यात थंडीच्या लाटेची शक्यता, पारा 8 अंशावर; पुणेकरांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
पुणे: Pune Weather Updates | पुण्यामध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. शहरातील किमान तापमान ८ अंशावर पोहोचले आहे. थंडीची लाट येणार असल्याने हा पारा आणखी खाली घसरू शकतो. या थंडीमुळे अनेकजण आजारी पडत असून सर्दी, ताप , श्वसनविकार, सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
मागील आठवड्यापासून पुण्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होत आहे. त्यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्यामुळे नागरिकांचा सूर्यप्रकाशात राहण्याचा वेळ कमी झालेला असतो. वातावरण थंड असते. त्यातून शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाची पातळी कमी झालेली असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. थंडी वाढल्यावर नागरिक अधिक काळ घरामध्येच थांबतात.
परिणामी घरातील सदस्यांमध्ये जंतूसंसर्ग वेगाने पसरण्याचा धोका असतो. यामुळे ताप, सांधेदुखी, सर्दी अशा तक्रारी सुरू होतात. या तक्रारी टाळण्यासाठी बदलत्या हवामानानुसार आहार आणि जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक असते, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी