Nana Patole | एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

nana patole

ऑनलाइन टीम – Nana Patole | काँग्रेसने संध्याकाळी (Congress) वाढेलेल्या मतदानावर शंका उपस्थित केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी आणि दुसर्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी यात 1.03 टक्क्यांची तफावत असल्याचे म्हटले आहे. तसेच एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)

विधानसभा निवडणुकीच्या निकालांविरोधात पराभूत उमेदवारांसह महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. दुसर्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारी 66.05 टक्के होती. निवडणूक आयोगाने स्वत: जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्के ची तफावत कुठून आली? एका दिवासात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वत: पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नमूद केले आहे. (Nana Patole)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी