Katraj Chowk Flyover | कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूकीत बदल; 3 डिसेंबरपासून सेगमेंटल लॉंचिंगचे सुरु होणार काम
पुणे : Katraj Chowk Flyover | पश्चिम महाराष्ट्रातून पुणे शहर व मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी कात्रज येथे महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कात्रज येथील चौकात दिवसरात्री मोठी गर्दी असते. तसेच पुण्याच्या बाह्य वळण रस्त्यावरील कात्रज ते कोंढवा हा महत्वाचा रस्ता आहे. वाहतूकीचा प्रचंड दबाव असल्याने कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम अडकलेले आहे. यापूर्वी एकदा ते करण्यास सुरुवात केली. त्यावेळी येथील वाहतूकीत बदल केल्याने अभुतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हे काम सातत्याने पुढे ढकलले जात होते. आता वाहतूकीचे नियोजन वाहतूक शाखेने केले असून ३ डिसेंबरपासून हे काम सुरु होणार आहे. त्यामुळे या चौकात येणार्या रस्त्यावरील वाहतूकीत मोठे बदल करण्यात येत आहे.
- जड/अवजड वाहने (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुडस मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहनांना कात्रज चौकात येण्यास बंदी करण्यात आली आहे.
१) साताराकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणार्या वाहनांना शिंदेवाडी पुल येथे प्रवेश बंद राहील.
२) सातार्याकडून नविन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील.
३) मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील.
४) सोलापूरकडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील.
५) सासवडकडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील.
६) बोपदेव घाटकडून कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना खडी मशीन चौकापुढे प्रवेश बंद राहील.
७) मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणार्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील.
८) स्वारगेट कडून कात्रजमार्गे सातार्याकडे जाणार्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
वरील मार्गावरील जड/अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करु इच्छित स्थळी जावे.
मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १० ते पहाटे ४ वाजेदरम्यान प्रवेश चालू राहील. परंतु, त्यांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.
ब) एस टी बसेस व ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूकीसाठी खालील प्रमाणे बदल
१) मुंबईकडून वारजेमार्गे कात्रज चौकाकडे येणार्या एस टी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहिल.
२) सातार्याकडून स्वारगेटकडे येणार्या एस टी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांनी नवले पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन कात्रज येथून स्वारगेटकडे जावे. (सिंहगड रोडवरील एस टी बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरील मागार्चा वापर करावा.)
क) मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांनी स्वारगेटकडे जाण्याासाठी शक्यतो कात्रज चौकाकडे न जाता इतर उपलब्ध पर्यायी मार्गाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी केले आहे. (Katraj Chowk Flyover)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी