Ravindra Dhangekar – Baba Adhav | निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत; रविंद्र धंगेकर यांची सरकारवर टीका

Ravindra Dhangekar-Baba Adhav

डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष उपोषणाला पाठिंबा

पुणे : Ravindra Dhangekar – Baba Adhav | विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुदतीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असे सांगण्यात आले होते. मुदत उलटली तरी राष्ट्रपती राजवट लागू केली नाही. निवडणूक आयोगासह सर्व केंद्रीय यंत्रणा सरकारच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. निवडणुकासुद्धा हायजॅक केल्या जात आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शनिवारी केली.

लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाला शनिवारी रविंद्र धंगेकर यांनी भेट देवून पाठिंबा दर्शवला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र धंगेकर म्हणाले, निवडणूक यंत्रणा हाताशी धरून लोकशाहीची झालेली चिरफाड संपूर्ण महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या सर्वांना संघर्षाचे आवाहन करत ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी त्यांची भेट घेवून यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्यासह संविधानावर श्रद्धा असलेला, लोकशाहीवर विश्वास असलेला प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी आहे.

गेल्या १० वर्षांत लोकशाहीला घातक वातावरण देशात निर्माण झाले आहे. हुकुमशाही लादली जात आहे.
वैयक्तिक हल्ले, जातीयवादी आणि विषारी प्रचार केला जात आहे. जे ऐकत नाहीत त्यांना इडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. वैभवशाली भारताची लोकशाही संपवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने लोकशाहीच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे, असे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’

PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे

You may have missed