Raosaheb Danve | राज्यातील सत्तास्थापनेला कालावधी का लागतोय? रावसाहेब दानवेंनी सांगितलं खरं कारण; म्हणाले,…

Raosaheb Danve

मुंबई : Raosaheb Danve | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले मात्र अद्यापपर्यंत महायुतीकडून सत्तास्थापन करण्यात आलेले नाही. दरम्यान आता ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. महायुतीच्या सत्तास्थापनेला इतका कालावधी का लागत आहे? याबाबत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले आहे. (Who Will Next CM Of Maharashtra)

माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, ” विधानसभेच्या निवडणुका आम्ही युतीतील मित्रपक्षांसोबत लढलो आहोत. यात प्रत्येक पक्षाला चांगले यश मिळाले आहे. प्रत्येक पक्षाचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर आता या निवडून आलेल्या आमदारांना मतदारसंघाचा दौरा करावा लागतो. तसेच आपण निवडून दिलेल्या आमदाराला भेटण्याची मतदारसंघातील मतदारांची इच्छा असते.

तर असे न झाल्यास मतदारांमध्ये निराशा पसरते. त्यामुळे हा दौरा आमदाराला करावा लागतो. आता निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या आमदारांचे यात दोन दिवस गेले आहेत “, असे म्हणत दानवे यांनी सत्तास्थापनेसाठीच्या लागणाऱ्या कालावधीचे कारण सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, ” शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने आपल्या पक्षाचे विधिमंडळ नेते नेमले आहेत. तसेच आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. यात विधिमंडळ नेते नेमले जातील. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसून महायुतीचा शपथविधी कधी करायचा याचा निर्णय घेतील. याआधी मुख्यमंत्री निवडण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला आहे. आता तर फक्त ८ दिवसच झाले आहेत.

बहुमत आले म्हणून काय झाले, निर्णय घेण्यास वेळ लागतो. आम्हाला कसली घाई नाही.
तसेच अजून कोणता घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला तर हे पक्ष अजून का वेळ घालवत आहेत,
असा प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे आमचा निर्णय आम्ही घेतो. पुढील तीन ते चार दिवसात आमचा निर्णय कळवतो”, असे रावसाहेब दानवे यांनी म्हंटले आहे. (Raosaheb Danve)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed