Eknath Shinde News | मंत्रिपदाचे वाटप अद्याप गुलदस्त्यात; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार?

CM Eknath Shinde

मुंबई : Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले मात्र तरीही अद्याप सत्तास्थापन होऊ शकलेले नाही. दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळाले असले तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे. महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये मंत्रिपदाचे वाटप कसे होणार हे गुलदस्त्यातच आहे. गृहखात्यावरून शिवसेना (Shivsena Shinde Group) आणि भाजपमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे.

मागील सरकारच्या फॉर्म्युल्याप्रमाणे फडणवीस यांच्याकडे ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृहखाते होते तसेच आताही शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृहखाते असायला हवे अशी भूमिका शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी नाराजी व्यक्त करत या चर्चा माध्यमांसमोर बोलून काही होत नसते असे म्हंटले आहे.

दरम्यान ५ डिसेंबरला आझाद मैदानावर (Azad Maidan Mumbai) शपथविधी सोहळा होईल याबाबत बावनकुळे यांनी एक्स वरून माहिती दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाकडून गटनेता निवडण्यात आला आहे. ३ डिसेंबरला भाजप आपला गटनेता निवडणार आहे. दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे या गावी आहेत.

त्याठिकाणी ते आजारी असल्याची माहिती आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.
आणखी दोन दिवस शिंदे यांनी आराम करावा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
माजी मंत्री दीपक केसरकर शिंदे यांच्या भेटीसाठी दरे गावी गेले होते मात्र शिंदे
यांची तब्बेत ठीक नसल्याने भेट न घेताच ते मुंबईला परतल्याची माहिती आहे. (Eknath Shinde News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed