Kondhwa Pune Crime News | कोंढवा: सिंहगड सिटी स्कुलमध्ये वीजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यु; संचालक धनंजय मंडलीक, ट्रान्सपोर्ट सुपरवायजर दौलत ढोक, इस्टेट सुपरवायजर विजय कुंभार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

पुणे : Kondhwa Pune Crime News | बस धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या कॉम्प्रेसरला अर्थींग नसल्याने वीजेचा धक्का बसून त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) सिंहगड सिटी स्कुलचे कॅम्पस (Sinhagad City School Campus) संचालक धनंजय तुकाराम मंडलीक (Dhananjay Tukaram Mandalik), संस्थेचे ट्रान्सपोर्ट सुपरवायजर दौलत दत्तात्रय ढोक (Daulat Dattatreya Dhok), इलेक्ट्रीक सुपरवायजर इस्टेट सुपरवायजर विजय संपत कुंभार (Vijay Sampat Kumbhar) तसेच सिंहगड संस्था व संस्थेतील इतर संंबधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संतोष पांडुरंग माळवदकर (वय ४९) असे मृत्यु पावलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुनिता संतोष माळवदकर (वय ४१, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगर (Tilekar Nagar Kondhwa) येथील सिंहगड सिटी स्कुलमध्ये १८ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती संतोष पांडुरंग माळवदकर हे स्कुलची बस धुवत होते.
सदोष कॉम्प्रेसर व वायरींगमधून तसेच त्या ठिकाणी आर्थिग नसल्याने त्यांना वीजेचा धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यु झाला.
या कॉम्प्रेसर व विद्युत जोडणीबाबत योग्य काळजी न घेतल्याने संस्थेच्या पदाधिकार्याचा निष्काळजीपणा व
बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने संतोष माळवदकर यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यु झाला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर (API Rajesh Usgaonkar) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Kondhwa Pune Crime Court News | कोंढव्यात बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालविणार्याची जामिनावर मुक्तता
Uddhav Thackeray On Eknath Shinde | सत्तास्थापनेवरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले
– ‘राक्षसी बहुमत मिळाल्यावरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावं लागतंय’