Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ते 9 डिसेंबर दरम्यान सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह

Sonia Gandhi

माजी मुख्य मंत्री पृथ्वीराजजी चव्हाण उदघाटक

पुणे : Sonia Gandhi Birthday अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह २ ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत साजरा होत असून, सप्ताहाचे उदघाटन महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ही माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Monhan Joshi Congress) यांनी पत्रकार परिषदेत दिली. उदघाटन सोहळा सोमवार, दि.२ डिसेंबर रोजी पदमजी हॉल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड येथे सायंकाळी साडेपाच वाजता होईल.

सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचा उदघाटन सोहळा राजकारणात उत्सुकतेचा ठरलेला आहे. या सोहळ्यात नेत्यांनी आणि विचारवंतांनी केलेली भाषणे राजकारणात गाजलेली असून, त्यावर प्रदीर्घ काळ चर्चा होत राहिली आहे. यंदाचा सोहळाही तीच परंपरा सांभाळेल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे २० वे वर्ष आहे.

भारतीय संविधानाच्या ७५व्या वर्षानिमित्ताने ‘संविधान रक्षण अभियान’ असा विशेष कार्यक्रम या सप्ताहात होणार आहे.
याखेरीज महिलांना रोजगार मिळावा याकरिता घरगुती रोजगार शिबिर आयोजित केले जाणार आहे.
रक्तदान शिबिर, महाआरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांगांना फळे, मिठाई, कपडे वाटप
तसेच कष्टकरी महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सत्कारही केला जाणार आहे.
शहराच्या विविध भागात हे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. (Sonia Gandhi Birthday)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed