Sanjay Raut On Former CJI DY Chandrachud | “राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार”, संजय राऊत यांचे टीकास्त्र

मुंबई: Sanjay Raut On Former CJI DY Chandrachud | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरानंतर आता ५ डिसेंबरला सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम (EVM) वर टीका करताना दिसत आहेत. (Sanjay Raut On Former CJI DY Chandrachud)
यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. “राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले, ” भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले आणि म्हणाले की, ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल. हे सांगायला ते काय राज्यपाल आहेत का? मूळात त्यांना हे अधिकार आहेत का आणि हे अधिकार त्यांना कोणी दिले? राज्यपालांनी त्यांना सांगितला आहे का? राज्यपालांनी बावनकुळेंना कळवले आहे का? एकीकडे हे महायुतीवाले सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत आणि बावनकुळे पाच तारखेची घोषणा करत आहेत.
मला एक कळत नाही हे लोक घाबरतात का? राज्यात खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्याला चंद्रचूड जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक पेचाला जबाबदार आहेत”,अशा शब्दात राऊत यांनी निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले, ” २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली आहे. २६ नोव्हेंबर रोजी नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे होते. महायुतीच्या जागी महाविकास आघाडी असती तर एव्हाना या लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महायुतीला बहुमत मिळून अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे तरी त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेले नाही.
भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता ठरलेला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतके मोठे बहुमत आहे तरी विधिमंडळ नेता निवडता आलेला नाही. ते सरकार स्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. इतकेच काय तर सरकार स्थापनेसाठी कोणी राज्यपालांना भेटले नाही आणि राज्यपाल हे सगळे चालू देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी