Strand Life Sciences | आता कर्करोगाचे लवकर निदान होणार, स्ट्रँडच्या नव्या जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स आणि रिसर्च सेंटरची सुरुवात
स्ट्रँड लाइफ सायन्सेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहाय्यक कंपनी; 33,000 चौरस फूट परिसरात पसरलेले अत्याधुनिक जीनोमिक्स सेंटर
बंगळुरू : Strand Life Sciences | भारतातील अग्रगण्य जीनोमिक्स आणि बायोइन्फॉर्मॅटिक्स कंपनी स्ट्रँड लाइफ सायन्सेसने कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी एक नवीन रक्त आधारित टेस्ट सादर केली आहे. कॅन्सरस्पॉट नावाचा हा टेस्ट, कर्करोगाच्या ट्यूमर डीएनएचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त मिथाइलेशन प्रोफाइलिंग तंत्रज्ञानाचा वापर करतो. स्ट्रँड लाइफ सायन्सेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे.
कॅन्सरस्पॉट ही रक्तावर आधारित टेस्ट आहे. रक्तातील कर्करोगाच्या डीएनएचे मिथाइलेशन सिग्नेचर ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंग आणि खास विश्लेषण प्रक्रिया वापरली जाते . ही टेस्ट नियमित कर्करोग तपासणीसाठी सोपा आणि सोयीस्कर पर्याय आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries ) बोर्ड सदस्या ईशा अंबानी पीरामल (Isha Piramal Ambani) म्हणाल्या, “रिलायन्स मानवतेची सेवा करण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतात कर्करोग हे मृत्यूचे एक मोठे कारण बनत आहे. त्यामुळे रुग्ण, कुटुंबे आणि समाजावर मोठा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक ताण पडतो. स्ट्रँडचा नवीन कर्करोग ओळखणारी टेस्ट एक उत्कृष्ट आरोग्य सेवा उपाय आहे. जीनोमिक्सच्या सामर्थ्याचा वापर करून भारत आणि जगभरातील जीवन सुधारण्याच्या आमच्या दृष्टिकोनात ‘वी केअर’ हे तत्व नेहमीच दिसून येते.”
बंगळुरूमधील स्ट्रँडच्या अत्याधुनिक जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स आणि रिसर्च सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी स्ट्रँड लाइफ सायन्सेसचे सीईओ आणि सहसंस्थापक डॉ. रमेश हरिहरन म्हणाले, “कर्करोगाशी लढण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी वेळेवर इशारा मिळणे अत्यावश्यक आहे. आम्हाला एक सुलभ प्रारंभिक कर्करोग निदान चाचणी सुरू केल्याचा अभिमान आहे, ज्यामुळे लोकांचे प्राण वाचतील. आपल्या 24 वर्षांच्या इतिहासात, स्ट्रँड जीनोमिक्स क्षेत्रातील अग्रेसर राहिले आहे. हा कठोर बहुवर्षीय संशोधन अभ्यासाचा परिणाम आहे आणि भारतासाठी आणखी एक मोठे यश आहे.”
जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स आणि रिसर्च सेंटरचे उद्घाटन आज डॉ. चार्ल्स कॅंटर यांनी केले.
डॉ. कॅंटर हे जीनोमिक्स आणि बायोफिजिकल केमिस्ट्रीचे तज्ज्ञ असून त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, यूसी बर्कले आणि बोस्टन युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. 33,000 चौरस फूट पसरलेली ही अत्याधुनिक जीनोमिक्स प्रयोगशाळा आहे.
कॅन्सरस्पॉटबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया https://strandls.com/early-detection या संकेतस्थळाला भेट द्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी