Pimpri Chinchwad Police | ‘खाकी’ ने फुलवले मातृत्व ! तीव्र प्रसव वेदना होत असलेल्या महिलेची केली सुखरुप प्रसुती; वाकड परिसरात 2 महिला पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन

Pimpri Chinchwad Police

पिंपरी : Pimpri Chinchwad Police | दोन महिला पोलीस कर्तव्यावर असताना प्रसव वेदना होत असलेल्या एका गर्भवती महिलेने त्यांच्याकडे मदत मागितली. रुग्णवाहिका व डॉक्टर यांना येण्यास विलंब झाल्याने या महिलांनीच चक्क तिची प्रसृती आडबाजूला केली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. वाकड नाका (Wakad Naka) येथे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखून गर्भवती महिलेला केलेल्या मदतीमुळे या दोन महिला पोलीस अंमलदारांचा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Vinoy Kumar Choubey) यांनी सत्कार केला.

वाहतूक पोलीस अंमलदार नीलम चव्हाण (Neelam Chavan Police) आणि रेश्मा शेख (Reshma Shaikh Police) असे या महिलांचे नाव आहे. नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख या हिंजवडी वाहतूक विभागात (Hinjewadi Traffic Division) नेमणूकीस आहेत. त्या वाकड नाका येथे कर्तव्यावर होत्या. तेव्हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजश्री माधव वाघमारे (वय २५) या प्रसृतीसाठी औंध रुग्णालयात (Aundh Hospital) जात होत्या. वाकड नाका येथे त्यांच्या पोटात दुखु लागले.

प्रसव वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यांना काही करता येत नव्हते. प्रसंगावधान राखून नीलम चव्हाण व रेश्मा शेख यांनी या महिलेकडे धाव घेतली. रुग्णवाहिकेसाठी १०८ ला फोन केला. परंतु, तिला येण्यास वेळ लागणार होता. तेव्हा त्यांनी रोडच्या कडेला असलेल्या खोलीत आडोशाला त्यांना नेले. रेश्मा यांनी त्यांच्या माहेरकडील सातार्‍याचे डॉ. धनंजय जाधव यांना तत्काळ फोनवरुन घटना सांगितली. त्यांच्या सल्ल्यानुसार या दोघींनी चक्क डॉक्टरांचा अवतार धारण करत राजश्री यांची सुखरुप प्रसुती केली.

राजश्री यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.
बाळाची नाळ कापण्यासाठी काहीच नसल्याने डॉ. धनंजय जाधव (Dr Dhananjay Jadhav) यांनी बाळाच्या पोटापासून १० ते १२ सेंटीमीटरवर चिमटा लावण्याचा सल्ला दिला. पण तेथे चिमटाही नव्हता. तेव्हा त्यांच्याच सल्ल्याने बाळाच्या नाळेला त्यांच्या मातेची साडी कापून बांधली. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अर्धा तासाने रुग्णवाहिका आली. या दोघांना औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघेही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रेश्मा शेख आणि नीलम चव्हाण यांचा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गौरव केला. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर (Shashikant Mahavarkar), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त बापू बांगर (DCP Bapu Bangar), हिंजवडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे (Sr PI Prasad Gokule) उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed