Sanjay Raut On BJP | सत्तास्थापनेचा तिढा पुन्हा वाढणार? संजय राऊतांचे सूचक भाष्य; म्हणाले – “एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्ती”
मुंबई: Sanjay Raut On BJP | राज्याच्या सत्तास्थापनेची तारीख ठरली असली तरी मुख्यमंत्री पदी कोण असणार? मंत्रिपदाची माळ कोणकोणत्या नेत्यांच्या गळ्यात पडणार? याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्बेत ठीक नसल्याने चर्चा, बैठका पुढे ढकलल्या जात आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याने एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत”, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. तीन वर्षांपूर्वी ईडी, सीबीआय, दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडून पळून गेले. त्यांना तीन वर्षांत असं कोणतं टॉनिक मिळालं की ते दिल्लीला डोळे दाखवून रुसवे- फुगवे करून बसलेत. दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करतंय आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे”, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे याबाबत राऊत यांना विचारले असता ते पुढे म्हणाले, ” या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रुसवे फुगवे सुरू आहेत. मला वाटतं दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे.
दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशाप्रकारचे धाडस करू शकत नाही. कारण कोणाची हिंमत नाहीय सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची. एकनाथ शिंदे यांच्या मागे शक्तीमोचक वगैरे कोणी नाहीये. कोणी काही फसलं नाहीये. दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतोय. दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे असा डाव करू शकत नाहीत”, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी