Traffic Violation In Pune | पुणे : बेशिस्त वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल; पाच दिवसात २३ चालकांवर विविध कलमांतर्गत गुन्हे
पुणे : Traffic Violation In Pune | शहरातील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. असे असताना काही वाहनचालक वाहतूकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहन पार्क करुन ठेवतात. काही टपरी चालक भर रस्त्यावरच आपली टपरी उभारतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गेल्या पाच दिवसात २३ वाहनचालक व टपरी चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune Traffic Police)
शहरातील वाहतूकीची समस्या गंभीर बनली आहे. शहराच्या पेठ्यांबरोबरच उपनगरांमध्येही ही समस्या वाढत चालली आहे. त्यात अनेकदा टेम्पो, कारचालक त्यांचे वाहन कसेही जागा मिळेल तेथे पार्क करतात. आपल्या वाहनामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे का? त्यामुळे वाहतूक खोळंबली जात आहे का याचा काहीही विचार केला जात नाही. अशा वाहनांवर पूर्वी केवळ जार्मरची कारवाई केली जायची. तेव्हा वाहनचालक आता जार्मर लावला आहे तर, दंड भरावा लागणार, त्यामुळे ते त्यांची सर्व काम उरकून तेथे येत. त्यामुळे जार्मर कारवाईमुळे आणखीच वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे अशा वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविणार्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंढवा येथील मेरीयट हॉटेल समोरील रोडवर धोकादायक पद्धतीने तसेच वाहतूकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभ्या केलेल्या टेम्पोवर कारवाई करण्यात आली.
बधे वस्ती येथून मुंढवा चौकाकडे विरुद्ध दिशेने जाणार्या रिक्षावर गुन्हा दाखल.
केशवनगर येथे दुचाकी बेदरकारपणे चालविणार्यावर गुन्हा दाखल.
काकडे वस्तीच्या सुरुवातीला पी जी के एम स्कुलजवळ तयार जिलेबी विक्रीचा हरियाणा जिलेबी नावाचा स्टॉल रोडवर उभारुन वाहतूकीस व रहदारीस अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल
धायरी येथील डेकोवेर फर्निचरसमोर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने टेम्पो उभा केल्याने गुन्हा दाखल़.
या कलमांतर्गत गुन्हे दाखल
भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, २८५ आणि ३२४(४) नुसार बेशिस्त वाहनचालक व टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ५ हजार रुपये दंड, वाहन चालविण्याचा परवाना रद्द आणि गांभीर्यानुसार कारावासाची शिक्षा होऊ शकते.
वाहतूक पोलिसांनी या वर्षी २५ नोव्हेंबरपर्यंत ९ लाख ५ हजार ८४६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहेत.
या बेशिस्त वाहनचालकांकडून २४ कोटी ९० लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.
जवळपास ५१ कोटी ८६ लाख रुपयांची दंड वसुली या बेशिस्त वाहनचालकांकडे बाकी आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या