Police Protection Of Political Leaders | पुण्यातील ‘या’ आमदाराने नाकारले पोलीस संरक्षण; म्हणाले – ‘मतदारसंघातील जनता हेच सुरक्षा कवच’
पुणे : Police Protection Of Political Leaders | इंदापूर विधानसभा (Indapur Assembly) मतदारसंघातून दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुणे ग्रामीण (Pune Rural Police) पोलीस अधीक्षक कार्यालयाने (Pune SP Office) दिलेले पोलीस संरक्षण स्वीकारण्यास भरणे यांनी नकार दिला आहे. दत्तात्रय भरणे यांनी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याची हॅट्रिक केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना संरक्षणासाठी दोन शस्त्रधारी अंगरक्षक पुरवण्यात आले होते. मात्र संरक्षण स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यावरून सतत लोकांच्या संपर्कात राहणे, त्यांच्यासाठी सहजपणे उपलब्ध होणे हेच त्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे दिसून येते.
“संपूर्ण इंदापूर तालुका हेच माझे कुटुंब आहे. जनता हेच सुरक्षा कवच आहे. कुटुंबामध्ये वावरताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज आपल्याला भासत नाही”, अशी भावना आमदार भरणे यांनी व्यक्त केली आहे. सन २०१४ पासून आमदार भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र ते कधी ही पोलिसांच्या गराड्यात वावरताना जनतेला दिसले नाहीत. अगदी सहजपणे विना पोलिस संरक्षण ते मतदार संघात चौफेर फिरत असतात. (Police Protection Of Political Leaders)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या