Maharashtra Assembly Session | विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन ‘या’ तारखेपासून सुरु होणार; बहुमत चाचणीही पडणार पार
मुंबई : Maharashtra Assembly Session | विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर आज (दि.५) राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली आहे.
दरम्यान आता विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तर ९ डिसेंबरला बहुमत चाचणी घेण्यात येणार आहेत. अधिवेशनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करणार आहेत.
याबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ” १५ व्या विधानसभेचे नवनिर्वाचित २८८ सदस्य ७ आणि ८ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची बहुमत चाचणी होणार आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार हा ११ डिसेंबर किंवा १२ डिसेंबरला होऊ शकतो. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. हे अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. देवेंद्र फडणवीस हे चहापाण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांना प्रथेप्रमाणं १५ डिसेंबरला निमंत्रित करणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Session)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या