Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू; अपघातानंतर कार चालकाने पळ काढला

ओझर (पुणे) : Ozar Pune Accident News | विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर शुक्रवार (दि.६) सायं ६ वाजताच्या सुमारास मोटरसायकल व कार यांच्या धडकेत शिरोली बुद्रुक बोचरे मळा येथील एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रामदास निवृत्ती बोचरे (वय-५२) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायं ६वाजताच्या सुमारास रामदास हे आपल्या दुचाकीवरून विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे असणाऱ्या पेट्रोल पंपावर डिझेल आणण्यासाठी जात असताना कारखान्यावरून जुन्नरच्या दिशेला भरधाव वेगात जात असणाऱ्या मारुती कंपनीच्या इर्टिगा कारने समोरून दुचाकीवर येणाऱ्या रामदास यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत रामदास यांच्या डोक्याला व मांडीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना नारायणगाव रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या झालेल्या अपघातानंतर कार चालकाने कार घेऊन पळ काढला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत असून ही कार जवळपासच्याच गावातली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने मात्र शिरोली बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. नारायणगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अपघात झाला त्यावेळेला इर्टिगा कारचा टायर फुटला मात्र त्या अवस्थेतही इर्टिगा कारच्या चालकाने कार घेऊन
पळ काढला पुढे जाऊन याच कारने दोघांना उडवले असते मात्र ते सुदैवाने वाचले.
रामदास याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली कार ही कुरण या गावातली असल्याचे बोलले जात असून सदर अपघातग्रस्त कार व
चालक या दोघांनाही लपवण्यात आले असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे पोलिसांनी याचा शोध घ्यावा अशी मागणी शिरोली बुद्रुक गावातील नागरिक करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा