Mahayuti Govt Wearing In Ceremony | महायुती सरकारच्या शपथविधीत चोरांची चलती; 12.4 लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास

Mahayuti Govt Wearing In Ceremony

ऑनलाइन टीम – Mahayuti Govt Wearing In Ceremony | मुंबईतील आझाद मैदानात संपन्न झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी चोरांची चांगलीच चलती झाली. गर्दीचा फायदा घेत चोरांनी तब्बल 13 जणांच्या सोन्याची चेन, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी एफआयआर नोंदवायला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा दरम्यान काहींची सोन्याची चेन, पाकिट, पैसे चोरीला गेले. चोरट्यांचा, पाकिटमारांचा फटका बसलेल्या अनेकांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी नोंदवल्या. चोरीला गेलेला मुद्देमाल 12.4 लाख रुपयांचा आहे. या प्रकरणांमध्ये 13 जणांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांच्या तक्रारींच्या आधारे भारतीय न्याय संहिता 2023 च्या अंतर्गत 303(2) च्या अंतर्गत आतापर्यंत 13 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींची संख्या वाढत आहे. आम्ही त्यांचा तपास करत आहोत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटज तपासण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेटमधून बाहेर पडत असताना चोरांनी साधला डाव

मुंबईच्या कांदिवलीत राहत असलेले 64 वर्षीय शिवाजी गवळी शपथविधी सोहळ्याला गेले होते.
संध्याकाळी गेट क्रमांक 2 मधून बाहेर पडत असताना परिसरात बरीच गर्दी होती. तेव्हा त्यांची 3 तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली.
50 वर्षांच्या जयदेवी उपाध्याय यांचीही 2 तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली. तर फोर्ट परिसरात राहणाऱ्या 61 वर्षीय संतोष लाचके यांच्या 1.7 तोळ्याच्या सोन्याच्या चेनवर चोरट्यांनी डल्ला मारला. दादरला राहणाऱ्या 70 वर्षीय मोहन कामत यांच्यासोबतही असाच प्रकार घडला. त्यांची 3.5 तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली. या सगळ्यांनी आझाद मैदान पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. (Mahayuti Govt Wearing In Ceremony)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला

Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य; मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार

You may have missed