Anti Drone Unit For Border Security | भारत अँटी ड्रोन युनिट तयार करणार; गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले
ऑनलाइन टीम – Anti Drone Unit For Border Security | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भारत लवकरच अँटी-ड्रोन युनिट तयार करणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी संरक्षण आणि संशोधन संस्था व डीआरडीओ (DRDO) यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
बीएसएफच्या 60 व्या स्थापना दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शाह बोलत होते. ते म्हणाले की, आगामी काळात मानवरहित ड्रोनचा धोक गंभीर होणार आहे. पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन निष्क्रिय करणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येत्या काळात ड्रोनचा गंभीर धोका लक्षात घेता संरक्षण आणि संशोधन संस्था व डीआरडीओ यांच्या सहकार्याने संपूर्ण सरकारी दृष्टीकोनाने आम्ही या समस्येचा सामना करत आहोत. त्यामुळे आगामी काळात आम्ही देशासाठी सर्वसमावेशक अँटी ड्रोन युनिट तयार करणार आहोत. असेही शाह यांनी सांगितले.
सीमा सुरक्षित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रणाली
शाह म्हणाले की, पाकिस्तान (2,289 किमी) आणि बांगलादेश (4,096 किमी) सह भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सर्वसमावेशक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीवर (CIBMS) काम सुरू आहे. यासह, आसाममधील धुबरी (भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा) नदीच्या सीमेवर तैनात असलेल्या सीआयबीएमएसकडून आम्हाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे, परंतु काही सुधारणा आवश्यक आहेत. संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवर एक व्यापक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे, ती पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर लागू केली जाईल. असे शाह म्हणाले.
260 हून अधिक ड्रोन केले निष्क्रिय
अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 260 हून अधिक ड्रोन भारत-पाकिस्तानच्या सीमेवरून पाडण्यात आले किंवा जप्त करण्यात आले. गेल्यावर्षी म्हणजे 2023 मध्ये ही संख्या 110 होती. शस्त्रे आणि ड्रग्ज वाहून नेणार्या ड्रोनला रोखण्यात सर्वाधिक घटना पंजाबमध्ये घडल्या आहेत, तर राजस्थान आणि जम्मूमध्ये फारच कमी आहेत.
सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामवर विशेष भर
मोदी सरकार (Modi Govt) व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामद्वारे उत्तर सीमावर्ती गावांमध्ये कनेक्टिव्हिटी, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा सुधारत आहे, ज्यामुळे स्थलांतर थांबत आहे. देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम राबविण्यात येणार आहे, असे शाह यांनी सांगितले.
48,000 कोटी रूपयांचा निधी वाटप
शाह म्हणाले की, सीमा सुरक्षा वाढवणे आणि दुर्गम भागात राहणार्या लोकांसाठी काम करणे ही मोदी सरकारची सर्वात मोठी योजना आहे.
त्यासाठी 48,000 कोटी रूपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.
सुमारे तीन हजार गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर योजना चालविण्यात येत आहे. केंद्र सरकारने भारताच्या सीमेवर कुंपण,
रस्ते आणि इतर गोष्टींसाठी मोठा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. असे ही त्यांनी सांगितले. (Anti Drone Unit For Border Security)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला