Builder Amit Lunkad | बिल्डर अमित लुंकड, अमोल लुंकड आणि पुष्पा लुंकड यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रारींचा ‘पाऊस’

Amit Lunkad

महिना दीड टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या तक्रारी

पुणे : Builder Amit Lunkad | बाजारभावापेक्षा चांगला, दर महा दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांनी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पैसे ते त्यांना परत करत नसल्याने अनेकांनी पुणे शहर पोलीस दलातील (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेकडे (EoW Pune) तक्रार अर्ज दिले आहेत. पोलिसांकडून त्यावर तपास सुरु करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जामध्ये गुंतवणुकदारांनी अमित कांतीलाल लुंकड (Amit Kantilal Lunkad), अमोल कांतीलाल लुंकड (Amol Kantilal Lunkad) आणि पुष्पा कांतीलाल लुंकड (Pushpa Kantilal Lunkad) यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. लुंकड रियाल्टी (Lunkad Realty) या कंपनीद्वारे (आता स्कायवन कॉर्पोरेट पार्क – Sky One Corporate Park) लोकांकडून गुंतवणुक स्वीकारण्यात आली होती.

याबाबत प्रविणचंद जैन यांनी तक्रार अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपण २००९ मध्ये दिल्लीहून पुण्यात कुटुंबासह स्थायिक झालो. कांतीलाल लुंकड यांच्याशी आमच्या कार्यालयात भेट झाली. तेव्हापासून आम्ही एकमेकांना व्यावसायाच्या दृष्टीने ओळखत होतो. याच काळात लुंकड रियाल्टी यांनी आमचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या ठेवी व गुंतवणुक योजनाबाबत आश्वासित केले. अमित आणि अमोल लुंकड यांनी दरमहा दीड टक्का आणि सध्या मार्केटमध्ये असलेल्या दरापेक्षा अधिक परतावा देऊ, असे आश्वासन दिले. नियमित व्याज देऊ असे आश्वासित केले. त्यानंतर लुंकड रियाल्टीमध्ये प्रविणचंद जैन यांच्या नावे १ कोटी २५ लाख, रेखा जैन यांच्या नावे १ कोटी ४ लाख रुपये, रितेश जैन यांच्या नावे १ कोटी रुपये, रुची जैन यांच्या नावे १ कोटी ६० लाख रुपये, शिल्पा जैन यांच्या नावे ६३ लाख रुपये आणि अभिक जैन यांच्या नावे १ कोटी ९ लाख रुपये असे एकूण ६ कोटी ६१ लाख रुपये २०१४ -१५ मध्ये गुंतवणुक करण्यात आली.

त्यांच्याकडून सुरुवातीला या गुंतवणुकीवर नियमित व्याज येत होते. २०१९ पासून व्याज देण्यास अनियमितता होऊ लागली. यावर त्यांच्याशी वैयक्तिक, फोन द्वारे संपर्क साधून तसेच रिमाईड लेटर पाठवून वेळोवेळी व्याज देण्याची मागणी करण्यात आली. अमित लुंकड यांनी वेळोवेळी व्याज देण्याचे आश्वासन दिले. त्यावर त्यांनी लुंकड रियाल्टीच्या नावाने २४ सप्टेबर २०२४ या तारखेचे धनादेश दिले. हे धनादेश पास होतील, असे आश्वासन अमित लुंकड यांनी दिले. परंतु बँकेमध्ये ते डिपॉझिट केले असता अपुरा निधी असल्याचे कारण देऊन बँकेने ते धनादेश परत पाठविले. त्यावर चेक बाऊंन्स झाल्याने बँकांनी मोठ्या दंडाची आकारणी केली आहे. अशा प्रकारे ६ कोटी ६१ लाख रुपये या मुद्दलावर ६ कोटी ८१ लाख ३२ हजार १५० रुपये व्याज असे मिळून १३ कोटी ४२ लाख ३२ हजार १५० रुपयांची फसवणुक केली आहे, असे प्रविणचंद जैन यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. (Cheating Fraud Case)

अशाच प्रकारे अनेकांनी आपली कोट्यावधींची फसवणुक झाल्याच्या तकारी आर्थिक गुन्हे शाखेकडे केल्या आहेत.
याबाबत सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ (DCP Vivek Masal) यांनी सांगितले की,
अतिम लुंकड व इतरांनी फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आमच्या विभागाकडे आल्या असून त्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. (Builder Amit Lunkad)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला

Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य; मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार