Malegaon Accident News | आपत्कालीन दरवाजाने घात केला; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बसमधून पडून जागीच मृत्यू

मालेगाव : Malegaon Accident News | बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने कंक्राळे येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा बसमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जयश्री केदा कन्नोर (वय-१६, रा. कंक्राळे ता.मालेगाव ) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री शाळेत बसने जात होती. गर्दी असल्याने ती बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी होती. गर्दीमुळे अचानक दरवाजा उघडल्याने दरवाजातून ती थेट बाहेर जमिनीवर पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा यामध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी केदा कन्नोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी बस चालक व वाहक प्रशांत चव्हाण व नितीन शेवाळे यांच्याविरुद्ध जयश्रीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
बसमधून खाली पडलेल्या जयश्रीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला ग्रामस्थांनी तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत झाली असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. (Malegaon Accident News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन