Viman Nagar Pune Crime News | टुरिस्ट टॅक्सीचालकाला कॅब चालकांकडून मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी; विमानतळावरील एरोमॉल पार्किंगमधील घटना (Video)

Viman Nagar Crime

पुणे : Viman Nagar Pune Crime News | स्थानिक असल्याचे सांगत एका टुरिस्ट टॅक्सीचालकाला कॅब चालकांनी मारहाण (Attack On Taxi Driver) करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DDd8C6FJwnl

याबाबत बंडु शहा देव दराडे (वय २८, रा. आंबेठाण, चाकण) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिषेक गणेश खांडेकर (वय २९, रा. नाना पेठ), रोहिदास सुदाम पवार (वय ४८, रा. लोहगाव) आणि बाबासाहेब ज्ञानोबा खांदवे (वय ५०, रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची टुरिस्ट टॅक्सी आहे. ते एरोमॉल येथील चौथ्या मजल्यावरील पार्किंगमधून खाली घेऊन येत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेला कॅबचालक सारखा हॉर्न वाजवत होता. त्यामुळे ते तिसर्‍या मजल्यावर गाडी बाजूला घेऊन थांबले. तेव्हा हॉर्न वाजविणारा कॅबचालक येऊन त्यांना म्हणाला की, तुला गाडी जोरात चालवायला काय झाले़ मला उशीर होतोय़ का रे लय माजला आहेस काय, असे म्हणून शिवीगाळ केली. हाताने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या ओळखीचे आणखी २ कॅबचालक तेथे आले.
त्यांनीही हाताने मारहाण केली. “तू पुन्हा येथे धंदा करुन दाखव, तुला आम्ही दाखवतो, आमही येथील स्थानिक लोक आहे.
आमच्या नादाला लागू नको़” असे म्हणून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत़

या प्रकारानंतर डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय गीग कामगार मंच्याच्या कॅब चालकांनी काम बंद आंदोलन केले.
त्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Viman Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन