Pune Crime News | तरुणाच्या पोटात चाकू भोसकून केले जखमी

Murder Case

पुणे : Pune Crime News | मला कामावर काढले, आता तूही कामावर जाऊ नये, असे सांगितले असताना न ऐकल्याने तरुणाच्या पोटात चाकू भोसकून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Attempt To Murder)

याबाबत अजीम हमीद पठाण (वय २४, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितेश बाबु मांजरेकर (वय २८, रा. एस के कुसाळकर बंगल्यासमोर, जुनी वडारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुनी वडारवाडीतील पठाण यांच्या बिल्डिंग समोरील रोडवर शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडला. (Stabbing Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीम पठाण व नितेश मांजरेकर हे बावधन येथील वेंकीज येथे हेल्पर म्हणून काम करत होते. दोन तीन दिवसांपूर्वी नितेश याचा मॅनेजरसोबत वाद झाला. त्यावरुन नितेश याला कामावरुन काढून टाकले होते. फिर्यादी हे घरी असताना नितेश फिर्यादीला म्हणाला की तू वेंकीजमध्ये कशाला कामाला जातो़, यावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी रात्री अजीम पठाण हे घरासमोर आले असताना नितेश याने त्याला बोलावून घेतले. तू वेंकीजमध्ये कशाला कामाला जातोस, असे बोलून शिवीगाळ केली. या दरम्यान फिर्यादी हे नितेश याला धक्का मारुन घरी जात असताना नितेश याने पँटचे खिशातून चाकू काढून पठाण यांच्या पोटामध्ये डाव्या बाजूला भोसकले. त्यामुळे पठाण खाली पडले. हे पाहून बाजूला असलेल्या फिर्यादी यांचा मित्र विशाल शिगवणे हा जोरात ओरडला. तेव्हा नितेश मांजरेकर हा पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (Narendra Patil) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन