Maharashtra Cabinet Expansion | पुण्यातून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणे यांचा मंत्रिमंडळात समावेश
पुणे : Maharashtra Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी सायंकाळी विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये पुण्यातील आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माधुरी मिसाळ (Madhuri Misal), दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा समावेश होणार आहे.
आमदार माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा (Parvati Assembly) मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात प्रथमच समावेश होत आहे. चंद्रकांत पाटील हे माजी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गेल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उच्च शिक्षण विभाग होता.
माजी मंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा (Indapur Assembly) मतदारसंघातून तिसर्यांदा निवडून आले आहेत. सार्वजनि बांधकाम, मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यापूर्वीच शपथविधी झाला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन