Koregaon Park Pune Crime News | मैत्रीचे संबंध ठेवून 1 कोटी 12 लाखांची ज्येष्ठाची केली फसवणूक; गाडीही घेतली, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी

Pune Crime News | Two youths cheated of Rs 14 lakhs on the pretext of getting a job in railways

पुणे : Koregaon Park Pune Crime News | मैत्रीचे संबंध ठेवून लोणावळा येथील फार्म हाऊससाठी जागा विकत देतो, शेअर मार्केटमधून उत्तम कमाई करुन देतो, असे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत कर्वेनगर (Karve Nagar Pune) येथील राहणार्‍या एका ५६ वर्षाच्या नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निशुन राधेशाम पटेल Nishun Radhesham Patel (वय ३९), मधुबाला राधेशाम पटेल Madhubala Radhesham Patel (दोघे रा. गुरुदत्त अ‍ॅव्हेन्यू, कोरेगाव पार्क) आणि विवेकआनंद देवन शेनॉय Vivek Anand Devan Shenoy (वय ६९, रा. पॉप्युलर हाईटस बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील गुरुदत्त अ‍ॅव्हेन्यमध्ये मार्च २०२३ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवले. त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादीला लोणावळा येथील फार्म हाऊससाठी जागा विकत देतो, असे सांगितले. शेअर मार्केटमधून उत्तम कमाई करुन देतो, असे आश्वासन दिले. फिर्यादी व त्यांची पत्नी यांच्याकडील १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये वेळोवेळी घेतले.
लोणावळा येथील जागा विकत दिलेली नाही़ व पैसेही परत दिले नाहीत.
तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याकरीता दिलेले पैसे देखील परत दिलेले नाही.
फिर्यादी वापरत असलेली गाडी स्वत:च्या वापराकरीता घेऊन ती परत न करता फसवणुक केली.
फिर्यादी यांनी पैशांची व जागेची मागणी केली असता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो, अशी धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव (PSI Deepak Jadhav) तपास करीत आहेत. (Koregaon Park Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार