Pune RTO News | पुणे : एजंट विसरा ! ड्रायव्हिंग स्कूलच्याच वाहनावर होणार ड्रायव्हिंगची टेस्ट, RTO ला जाण्याची गरज नाही

Pune RTO News | Beware of fake websites, apps and fake e-challan links; Transport Department appeals to citizens

पुणे : Pune RTO News | रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग प्रशिक्षणासंबंधी नवे नियम तयार केले आहेत. त्यानुसार जिथे वाहन चालवणे शिकलात, तिथेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी अधिकृत प्रशिक्षण केंद्रातून कार चालवण्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ठराविक एजंटांमार्फत ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत असे.

मात्र आता नियमात बदल झाले आहेत. या नियमांची अंमलबजावणी १ जून २०२४ पासून केली जात आहे. या अंतर्गत ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे नियम अधिक कडक झाले आहेत. जिथे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले, तिथेच टेस्ट देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवानादेखील विनाविलंब मिळत असल्याने नागरिकांची सोय झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक नागरिक याचा लाभ घेत आहेत. यापुढे कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमधून वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर तेथूनच प्रमाणपत्र मिळणार असल्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश आहेत. (Pune RTO News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार