Fog Chaos At Pune Airport | दाट धुक्यामुळे पुणे विमानतळावरील तब्बल २२ विमानांच्या उड्डाणांना फटका; विमानसेवा कोलमडली
पुणे : Fog Chaos At Pune Airport | मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचा तडाखा चांगलाच वाढला आहे. पुण्यातही मोठ्या प्रमाणात थंडी पाहायला मिळत आहे. अशातच शनिवारी (दि.२१) शहरात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली होती. याचा रस्ते वाहतुकीसोबतच विमानसेवेवरही परिणाम झाला. तब्बल २२ विमानाच्या उड्डाणांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी पडलेल्या दाट धुक्याचा सकाळी ६ ते दुपारी १२ दरम्यान २२ विमानांना याचा फटका बसला आहे. धुक्यामुळे अर्ध्या तासापासून ते तीन तासांपर्यंत विमानांच्या उड्डाणाला उशीर झाल्याचे दिसून आले.
दिल्लीनंतर बेंगळुरू, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चेन्नई, बँकॉक या शहरांसाठी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला. पुण्यात येणारे एक विमान दाट धुक्यामुळे पुणे विमानतळावर उतरु शकले नाही. ते दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विमानांची संख्या देखील वाढली आहे.
शनिवार, रविवारी तर तब्बल २०० पेक्षा जास्त विमानांची उड्डाणे होत आहेत.
शिवाय पुण्यातून देशातील ३५ विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे.
मात्र शनिवारी उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. (Fog Chaos At Pune Airport)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत