Goyal Properties Pune | राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचा गोयल प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीला दणका, घर खरेदीदारांना दोन महिन्यात रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश

Pune District Consumer

पुणे : Goyal Properties Pune | सदनिकेचे काम अपूर्ण असल्याने घर खरेदीदारांनी भरलेले पैसे दोन महिन्यांच्या आत सव्याज परत करण्याचा आदेश देऊनही त्याची पूर्तता करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बांधकाम कंपनीची राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाने (National Consumer Protection Commission) गंभीर दखल घेतली आहे. घर खरेदीदारांना द्यावयाची उर्वरित रक्कम पुढील तारखेपर्यंत न भरल्यास बांधकाम कंपनीच्या भागीदारांनी आयोगासमोर समक्ष हजर राहावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

अब्राहम ॲरॉन, ब्राखा ॲरॉन व स्पेन्सर जोसेफ गोर्मनली आणि ब्रेडा गोर्मनली या दाम्पत्यांनी गोयल प्रॉपर्टीज बांधकाम कंपनी व भागीदार सुभाष गोयल (Subhash Goel), उन्मेश गोयल (Unmesh Goel) आणि रामचंद्र गोयल (Ramchandra Goel) यांच्याविरोधात २०१८ मध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांच्या वतीने ॲड. ज्ञानराज संत (Adv Dnyanraj Sant) यांनी बाजू मांडली.

या कंपनीतर्फे वानवडी येथे बांधण्यात येत असलेल्या ‘गंगा संपत्ती’ (Ganga Sampatti in Wanwadi) प्रकल्पात तक्रारदार दाम्पत्यांनी फ्लॅट बुक केले होते. त्यासाठी त्यांनी ९५ टक्के रक्कमही दिली होती. त्यांच्याशी कंपनीने नोंदणीकृत करारनामेही केले होते. त्यानुसार तक्रारदार दाम्पत्यांना डिसेंबर २०११ मध्ये सदनिकेचा ताबा देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, या मुदतीत अवघे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले.

बांधकाम प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून सदनिकेचा ताबा मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या तक्रारदार दाम्पत्यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. त्यावर ॲड. ज्ञानराज संत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून राष्ट्रीय ग्राहक आयोगाने तक्रारदार दाम्पत्याच्या बाजूने निकाल दिला होता.

राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाच्या आदेशानुसार संबंधित कंपनीने घर खरेदीसाठी निम्मी रक्कम परत केली.
परंतु उर्वरित रक्कम परत करण्यास दोन वेळा मुदतवाढ घेतली. त्यामुळे तक्रारदारांच्या वतीने
ॲड. ज्ञानराज संत यांनी आयोगाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दाद मागितली.

त्यावर आयोगाने आपल्या आदेशानुसार खरेदीदारांची उर्वरित रक्कम परत न केल्यास बांधकाम कंपनीने संचालक अनुज गोयल (Anuj Goel) व
अंकित गोयल (Ankit Goel) यांनी पुढील तारखेला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे असा
आदेश आयोगाचे पीठासीन सदस्य न्या. सुदीप अहलुवालिया (Justice Sudip Ahluwalia) व सदस्य रोहितकुमार सिंह यांनी दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed