API Nandkumar Kadam | पुणे : इमानदारी ! ‘आम्हाला पगार भरपूर आहे, तु गरीबाचे पैसे परत कर’; लाच देणार्याला पकडून देणारे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम

पुणे : (विवेक भुसे) – आम्ही इथे लोकांना न्याय देण्यासाठी आलो आहे. गरीबाचे पैसे लुबाडून ते तो पैसा मला देत होता. मी त्याला वारंवार सांगितले की, मला पैसे नको देऊस. मला भरपूर पगार आहे. तू त्यांचे पैसे परत कर. पण तो त्यांचे पैसे परत न करता मला पैसे देण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली (Pune ACB Trap). त्यांनी सापळा रचून त्याला पकडले, हे सांगत होते सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम (API Nandkumar Kadam).
कोल्हापूर येथे काँस्टेबल म्हणून काम करत असताना एमपीएससीची परिक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक झालेले नंदकुुमार कदम हे आज अनेक तरुणाचे आदर्श झाले आहेत. पोलीस खात्यात नव्हे तर सरकारी खात्यात यायचे ते कमविण्यासाठी अशीच दृष्टी अनेकांची असते. पण, त्यामध्येही काही वेगळे असतात. त्यापैकी एक नंदकुमार कदम. (Pune Bribe Case)
नंदकुमार कदम यांचे वडिल प्रकाश कदम हेही पोलीस खात्यात होते. ते पोलीस निरीक्षक म्हणून सांगली येथून निवृत्त झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नंदकुमार कदम हे काँस्टेबल म्हणून २००६ मध्ये पोलीस सेवेत भरती झाले. नोकरी करत असतानाच त्यांनी अभ्यास करुन एमपीएससी परीक्षा पास झाले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची गडचिरोली येथे साडेतीन वर्षे सेवा केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे साडेतीन वर्षे सेवा केली. त्यानंतर मुंबईत सेवा करत असताना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढतीसह ते पुणे शहर पोलीस दलात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते सध्या कार्यरत आहेत.
या गुन्ह्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मला पैशात रस नाही. काम करताना कोणाला तरी न्याय देण्याचा प्रयत्न करणे हे माझे ध्येय आहे. या गुन्ह्यात इस्टेट एजंट असलेल्या हसनअली बारटक्के याने एका महिलेची फसवणूक केली आहे. या महिलेला फ्लॅट घ्यायचा होता. बारटक्केच्या मार्फत त्यांनी फ्लॅट घ्यायचा निर्णय घेतला. त्यासाठी बारटक्के याला साडेचौदा लाख रुपये दिले होते. बारटक्के याने हे पैसे घरमालकाला देण्याऐवजी स्वत:कडे ठेवले. त्यांचा व्यवहार झाला नाही. तेव्हा त्याने आपण २०टक्के कमिशन कापून पैसे देतो, असे या महिलेला सांगितले. जर व्यवहारच झाला नाही तर कमिशन घेता येणार नाही, असे त्याला सांगितले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला बोलावले होते.
तेव्हापासून तो मला पैसे देण्याचा प्रयत्न करत होता. फिर्यादीच्या पैशातील पैसे देण्याचे आमिष तो दाखवत होता. मला ते पटले नाही. त्याला मी सांगितले की मला भरपूर पगार आहे. मला काही पैसे नको. त्या महिलेचे पैसे देऊन टाक. तरीही तो ऐकत नव्हता. तेव्हा चौकशी करुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्याकडे अशी ऑफर केस दुर्मिळ होती. लाच घेणे जसा गुन्हा आहे, तसेच लाच देणेही गुन्हा आहे. त्यांनी त्यावर अभ्यास करुन सापळा रचला. सापळा कारवाईच्या वेळीही तो मला पैसे घेण्याची गळ घालत होता. खात्यामध्ये मी काही तरी करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मनाला ते पटत नव्हते.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे अशी ऑफर केसच्या तक्रारी येणे दुर्मिळ आहे.
गेल्या काही वर्षांमधील ही पहिलीच केस आहे.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की,
अशा ऑफर केस दुर्मिळ असतात. काही अधिकारी, कर्मचारी हे नेहमी अशा प्रकारच्या लाचेला विरोध करतात.
ही चांगली गोष्ट आहे. इतर केसमध्ये तक्रार करणार्याकडे पैसे मागितले जात
असल्याने त्याच्याकडील पैशांना पावडर लावून ते पैसे लाच म्हणून दिले जातात.
अशा ऑफर केसमध्ये आरोपीकडे पैसे असतात. पण, अशा वेळी पंचासमक्ष कारवाई होते.
व्हाईस रेकॉर्डरवर त्यांच्यातील संभाषण नोंदविलेले असते. अशा ऑफर केसेस वाढल्या पाहिजेत. (API Nandkumar Kadam)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत