Gold Rates In Maharashtra | एकाच दिवसात सोन्याच्या किंमतीत 400 रुपयांची वाढ तर चांदीचा दरही 500 रुपयांनी वधारला

Gold

जळगाव : Gold Rates In Maharashtra | गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात अचानक घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज सोन्याने उसळी घेतली. दिवसभरात प्रति दहा ग्रॅममागे ४०० रुपयांची तर चांदीत प्रतिकिलो ५०० रुपयांची भाववाढ नोंदविली गेली.

डिसेंबर अखेरपर्यंत नाताळची धामधूम असल्याने सोन्या-चांदीला परदेशात कमी मागणी राहिली. यामुळे भाव कमी झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले होते. डिसेंबर मध्ये सुरवातीपासून सोन्याचे भाव तेजीत होते. त्यानंतर भावात घसरण सुरू झाल्याने २१ डिसेंबरला सोने प्रती दहा ग्रॅमला ७६ हजार ४०० रुपयांपर्यंत तर चांदीचा भाव ८९ हजारपर्यंत (प्रती किलो) (विना जीएसटी) खाली आला होता.

दरम्यान, काल सोने ७६ हजार ६०० (प्रती दहा ग्रॅम) तर चांदी ९० हजारांवर पोहोचली होती. त्यात आज सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ होऊन सोने प्रती दहा ग्रॅममागे ७७ हजारांवर पोहोचले तर चांदीत ५०० ने वाढ होऊन किलोमागे भाव ९० हजार ५०० रूपयांवर पोहोचला.

मागील सात दिवसातील सोन्याचे भाव: (रुपयांमध्ये)

१४ डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७७ हजार – चांदी (प्रतिकिलो) ९१ हजार ५००

१७ डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७६ हजार ७००- चांदी (प्रतिकिलो) ९१ हजार

१९ डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७५ हजार ९००- चांदी (प्रतिकिलो) ९० हजार

२० डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७५ हजार ८००- चांदी (प्रतिकिलो) ८७ हजार ५००

२१ डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७६ हजार ४००- चांदी (प्रतिकिलो) ८९ हजार

२६ डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७६ हजार ६००- चांदी (प्रतिकिलो) ९० हजार

२७ डिसेंबर- सोने (प्रति दहा ग्रॅम) ७७ हजार- चांदी (प्रतिकिलो) ९० हजार ५००

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed