Viman Nagar Pune Crime News | पुणे: ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांची ‘धाड’; जाळ्यात अडकले 4 महाविद्यालयीन तरुण ‘गॅम्बलर’

Online Gambling

पुणे : Viman Nagar Pune Crime News | लोटस ३६५ या (Lotus365 ) बंदी असलेल्या ऑनलाईन जुगार (Online Gambling) चालविणार्‍या अड्ड्यावर पोलिसांनी (Viman Nagar Police) धाड टाकून महाविद्यालयीन तरुणांसह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ मोबाईल, २ लॅपटॉप, १ टॅब असा माल जप्त करण्यात आला आहे.

विशाल श्रीधर राख Vishal Sridhar Rakh (वय २६, रा. डी वाय पाटील रोड, वृंदावन बिल्डिंग, लोहगाव), समाधान उद्धव शिरसाट Sanadhan Uddhav Shirsat (वय २०), सौरभ नवनाथ राख Saurabh Navnath Rakh (वय २१) आणि महेश पांडुरंग शिरसाट Mahesh Pandurang Shirsat (वय २६, सर्व रा. वृंदावन बिल्डिंग, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस हवालदार धर्मा नंदकुमार चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई लोहगावमधील डी वाय पाटील रोडवरील (DY Patil Road Lohegaon) वृंदावन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधीत केलेल्या लोटस ३६५ या वेबसाईटवरुन विना परवाना ऑनलाईन जुगार खेळविला जात असल्याची बातमी विमानतळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वृंदावन बिल्डिंगमध्ये छापा घातला. दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लोटस ३६५ या वेबसाईटसवरुन स्वत:च्या वर बुकींच्या आर्थिक फायद्याकरीता विना पवाना ऑनलाईन जुगार खेळवताना जुगाराचे साहित्य मिळून आले.

तसेच ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात आलेले बँक खाते व सीम कार्डचे आधारे
या खातेधारकांची ओळख वापरुन लॅपटॉपवरुन ग्राहकांकडून ते पैसे घेत होते.
पैसे देणार्‍या ग्राहकांना ऑनलाईन जुगार खेळवुन त्यांची व शासनाची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी चौघांना अटक केली असून अधिक तपासासाठी न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत. (Viman Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed