Pune Police MPDA Action | धडाकेबाज ! अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 103 अट्टल गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

Amitesh Kumar-MPDA Action

पुणे : Pune Police MPDA Action | शहराच्या विविध भागात दहशत माजवून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍या अट्टल गुन्हेगारांविरुद्ध (Criminals On Police Record) पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी एमपीडीए कायद्याचे हत्यार (MPDA Act) उपसले. गेल्या वर्षभरात पोलीस आयुक्तांना तब्बल १०३ गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी ३१ जानेवारी २०२४ रोजी नियुक्ती झाली आहे. त्यांनी अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचे कठोर धोरण राबविले. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, वाहन तोडफोड, दंगल, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, हत्यारे बाळगणे, गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणार्‍या व सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करणार्‍या १०३ अट्टल गुन्हेगारांना नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यातील विविध कारागृहामध्ये एक वर्षाकरीता स्थानबद्ध केले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अट्टल गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोका एमपीडीए सेल सुरु केला़ भाईगिरी करणार्‍यांविरुद्ध झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईसाठी पीसीबी विभागाला वेळोवेळी रेकॉर्ड प्राप्त करावे लागते. संबंधित गुन्हेगाराची मागील पाच वर्षातील गुन्ह्यांची माहिती एकत्रित करुन त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करुन एमपीडीएनुसार कारवाईला वेग दिला जातो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त एमपीडीएनुसार कारवाई करुन राज्यातील कोणत्याही कारागृहात गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करतात.

अमितेश कुमार यांनी अवघ्या ११ महिन्यात एमपीडीए कारवाईचे शतक पार केले.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक कठोर व
प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोका एमपीडीए सेलचे अधिकारी,
अंमलदार तसेच पोलीस ठाण्यातील सर्व्हेलस पथकातील अधिकारी व
अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे. (Pune Police MPDA Action)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune PMC News | नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार !
पर्यावरण पूरक प्रकल्प राबविणार्‍यां मिळकत धारकांमागेच प्रशासनाचा ‘तगादा’