Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक; बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात

पुणे : Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरारी घोषित केलेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात बीडच्या विशेष तपास पथकाला यश आले आहे.
सुदर्शन चंद्रभान घुले Sudarshan Chandrabhan Ghule (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि Sudhir Dnyanoba Sangle (वय २३, रा. टाकळी, ता. केज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड विशेष तपास पथकाने डॉ. संभाजी वायभसे याला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चौकशीत मिळालेल्या माहितीवर गोपनीय माहितगार नेमून तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन या दोघांना बीड विशेष तपास पथकाने ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) बीड पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची ९ डिसेंबर रोजी हत्या केली होती. राज्याच्या अधिवेशनात हे प्रकरण गाजले होते. हत्येनंतर आरोपी पळून गेले होते. बीड पोलिसांना (Beed Police) आरोपी सापडत नसल्याने विरोधकांनी याच्या मागे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा हात असल्याची टिका विरोधकांकडून केली जाऊ लागली. तेव्हा राज्य शासनाने हत्या व खंडणीचा गुन्हा सीआयडीकडे वर्ग केला. त्यांनाही आरोपी सापडत नव्हते. शेवटी वाल्मिक कराड (Walmik Karad) हा सीआयडीच्या पुणे कार्यालयात (Pune CID Office) स्वत: शरण आला. त्यानंतर बीड विशेष तपासाने फरारापैकी दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले. (Santosh Deshmukh Murder Case)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार !
पर्यावरण पूरक प्रकल्प राबविणार्यां मिळकत धारकांमागेच प्रशासनाचा ‘तगादा’
Pune Police MPDA Action | धडाकेबाज ! अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक;
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 103 अट्टल गुन्हेगारांना केले स्थानबद्ध