Pune PMC Election 2025 | आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा राहाणार! विधानसभेतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी ‘गलितगात्र’

PMC-BJP

पुणे : Pune PMC Election 2025 | विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे दिसत असल्याचे सत्ताधारी भाजपच्या तयारीवरून दिसून येत आहे. शहरातील महापालिकेशी संबधित प्रकल्प आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी उच्च स्तरावरील प्रयत्नांसोबतच विरोधी पक्षातील प्रमुखांना गळाला लावण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकरडे विधानसभेतील दारूण पराभवानंतर मात्र विरोधकांचे उरले सुरले अवसान गळाले असून फारशी हालचालही दिसून येत नसल्याने आगामी निवडणुकीत भाजपचाच (BJP) वरचष्मा राहाणार असल्याचे दिसून येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर उदयास आलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि अडीच वर्षात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी र्कॉग्रेसमधील (NCP) फुटीनंतर बदललेल्या राजकिय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे मागील पावणेतीन ते चार वर्षांच्या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या नसल्याने सर्वत्र प्रशासकराज सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अभूतपुर्व यश मिळवल्याने लवकरच न्यायालयीन निकाल लागून रखडलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वाधीक जागा मिळविलेल्या भाजपचा यामुळे अधिकच उत्साह वाढला आहे. २०१७ मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिकसह महत्वाच्या ९ हून अधिक महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केलेल्या भाजपला आगामी निवडणुकांमध्ये याहून अधिक यश मिळविण्याची आशा आहे. किंबहुना सर्वच महापालिकांत सत्ता स्थापण्यासाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेची निवडणुक देखिल स्वबळावर लढण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वॉर्ड बांधणीपासून ज्याठिकाणी विरोधी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP) आणि कॉंग्रेसने (Congress) मागील निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या होत्या तेथे विरोधकांनाच आपल्या पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. एवढेच नव्हे तर ज्याठिकाणी मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनाही फाईट देण्यासाठी विरोधकांचा वापर करण्याची व्यूव्ह रचना आखली आहे. त्यानुसार आज उद्धव ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) पाच माजी नगरसेवकांचा आणि पदाधिकार्‍यांचा पक्षात समावेश करण्यात आल्याचे दिसून आले.

यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal), खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यासह पक्षाचे पाचही आमदार केंद्र, राज्य आणि महापालिकेशी संबधित अगदी विमानतळ, मेट्रोसह राज्य व महापालिका स्तरावरील अगदी रस्त्यावरील खड्डे, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसारख्या विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे मात्र, महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेतही एखाद दुसर्‍या बैठकीशिवाय फारशा हालचाली दिसून येत नाहीत. मंत्रीमंडळ वाटपानंतर उपमुख्य अजित पवार यांनी शहरात एकच प्रशासकीय बैठक घेतली. मात्र, निवडणुक तयारीच्या दृष्टीने त्यांच्या स्तरावर फारशा हालचाली झालेल्या नाहीत. शिंदे गटाचे शहर प्रमुख विभागवार बैठका घेत आहेत, मात्र पक्ष म्हणून शहर पातळीवर सर्व जागा लढविण्यासाठी त्यांच्याकडे उमेदवारांचा वानवा आहे. शिंदे यांच्याकडील मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्याकडे नव्याने दाखल होणार्‍यांची संख्या देखिल कमालीची रोडावली आहे. (Pune PMC Election 2025)

विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे हातावर बोजण्या इतपत नगरसेवक राहीले आहेत.
तीनही पक्षाकडे शहर पातळीवरील तुल्यबळ नेतृत्वाचा अभाव आहे. स्वबळावर महापालिकेच्या १६३ जागा लढविण्याइतपत तिनही पक्षांची ताकद नाही.
तसेच विधानसभा निवडणुकीनंतर तीन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आल्याचे देखिल पाहायला मिळत नाही.
त्यामुळे आहे ते उमेदवार बलाढ्या भाजपला कसा लढा देणार याचे प्रश्‍नचिन्ह कार्यकर्त्यांपुढे आहे.
केवळ एखादा राजकिय चमत्कारच महाविकास आघाडीला निवडणूक लढविण्याचे बळ देउ शकतो,
असेच वातावरण महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.
त्यामुळे तूर्तास तरी शहरात भाजपच वरचढ असल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Weather News | येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Pune RTO | खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमीट असेल तर परत करा, आरटीओ कडून होणार कारवाई

Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात