Beed Crime News | बीड: पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आढळला पोलिसाचा मृतदेह, पोलीस दलात खळबळ
बीड : Beed Crime News | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून ९ डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली (Santosh Deshmukh Murder Case). त्यानंतर सुरु असलेल्या घडामोडींमुळे मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे. संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांनी कुचराई केल्याने बीड पोलीस प्रशासनही चांगलेच चर्चेत आहे. येथील काही पोलिसांचे आरोपी असलेल्या वाल्मिक कराडशी संबंध असल्याचेही पुढे आले. (Dead Body of Policeman Found In Beed SP Office)
यातच आता याठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनंत इंगळे असे गळफास घेतलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज (दि.८) पहाटे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर असताना टोकाचे पाऊल उचलले.
इंगळे यांनी अशाप्रकारे स्वतःला का संपवलं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने बीडच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. (Beed Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात