Sinhagad Road Pune Crime News | शहरातील वेगवेगळ्या भागातील व्यावसायिक पुना गेट लॉजमध्ये खेळत होते तिरट जुगार; सिंहगड रोड पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | धानोरी, शिवणे, कोंढवा, कोथरुड, वारजे माळवाडी येथील व्यावसायिक सिंहगड रोडवरील पुना गेट लॉज येथे एकत्र येऊन तीन पत्ती (तिरट – Teen Patti) हा जुगार खेळत होते. सिंहगड रोड पोलिसांनी लॉजवर छापा टाकून जुगार खेळणार्या ६ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ७३ हजार २१० रुपयांची रोकड व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई दि. ५ जानेवारी रोजी रात्री करण्यात आली आहे. (Police Raid On Gambling Den)
रवींद्र गुंदीया राठोड Ravindra Gundia Rathod (वय ४०, रा. श्रीरंग एंपायर, धानोरी), हनुमंत मानसिंग राठोड Hanumant Mansingh Rathod (वय ४०, रा. वेस्ट कोस्ट , शिवणे), रामु दासु चव्हाण Ramu Dasu Chavan (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आंबु भद्रु राठोड Ambu Bhadru Rathod (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, डहाणुकर कॉलनी, कोथरुड), सत्यम खिमया राठोड Satyam Khimaya Rathod (वय ३८, रा. सुसरुत रेसिडेन्सी, नर्हे), मोहन हरी चव्हाण Mohan Hari Chavan (वय ३६, रा. वारजे माळवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना त्या दिवशी अटक करण्यात आली होती. (Sinhagad Road Police)
याबाबत पोलीस अंमलदार विनायक मोहिते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार तारु, मगर, पोलीस अंमलदार पाटील, विनायक मोहिते हे ५ जानेवारी रोजी रात्री हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करत संतोष हॉलसमोर आले. तेव्हा त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुना गेट लॉज येथील पाचवे मजल्यावरील रुममध्ये काही जण जुगार खेळत आहे. या बातमीनुसार पोलीस रात्री दहा वाजता पुना गेट लॉजवर पोहचले. त्यांनी पाचव्या मजल्यावरील या खोलीमध्ये छापा टाकला. तेव्हा तेथे सहा जण तीन पत्ती नावाचा तिरट पत्यांचा पैसे ठेवून जुगार खेळत होते.
रवींद्र राठोड (२७९००रुपये), हनुमंत राठोड (१४०० रुपये), रामु चव्हाण(८६०० रुपये), आंबु राठोड (२९५०० रुपये),
सत्यम राठोड (१००० रुपये), मोहन चव्हाण (४८०० रुपये) असे एकूण ७३ हजार २१० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करीत आहेत. (Sinhagad Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका