ACB Trap On Bank Inspector | लाचेच्या राहिलेल्या रक्कमेसाठी तगादा लावणे बँक निरीक्षकाला पडले महागात; 1 लाख 10 हजार रुपये स्वीकारताना ACB ची सापळा कारवाई

acb logo

पुणे : ACB Trap On Bank Inspector | कामचोर कर्मचार्‍याकडून ५० हजारांची लाच घेऊन त्याच्याविषयीचा अनुकुल अहवाल दिल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन बँकेने त्याला पुन्हा कामावर रुजू करुन घेतले. त्यानंतर उरलेल्या १ लाख १० हजार रुपयांसाठी बँक निरीक्षकाने या कर्मचार्‍याकडे लकडा लावला. आता त्याचे काम झाले असल्याने या लिपिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना या बँक निरीक्षकाला रंगेहाथ पकडले.

राहुल रमेश पुजारी Rahul Ramesh Pujari (वय ४३, रा़ कोल्हापूर) असे या बँक निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हा जुलै २०२२ ते जून २०२३ दरम्यान पंढरपूर शाखेत लिपिक पदावर होते. या काळात १८५ दिवस त्यांनी लॉग इन केले नसतानाही त्या दिवशी मस्टरवर हजर असल्याचे दाखवून १८५ दिवसाचा पगार घेतला. तसेच त्याने बँकेतून घेतलेल्या कर्जाचे ७ महिन्याचे हप्ते भरले नाहीत़ अशा रितीने त्याने बँकेची फसवणूक केली, असे आरोप ठेवून महाराष्ट्र राज्य परिवहन बँकेने त्याला सेवेतून निलंबित करुन त्याची विभागीय चौकशी लावली. त्या चौकशी करीता बँकेचे कोल्हापूर शाखेतील बँक निरीक्षक राहुल पुजारी याची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. (Bribe Case)

या चौकशीमध्ये तक्रारदार याला मदत करण्यासाठी व लवकरात लवकर चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी राहुल पुजारी याने तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १ लाख ६० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारल्यानंतरच राहुल पुजारी याने तक्रारदार याचा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवून दिला.

त्यानंतर बँकेने ३० नोव्हेबर २०२४ रोजी तक्रारदार याचे निलंबन रद्द करुन सेवेत हजर करुन घेतले. त्याची महाराष्ट्र राज्य परिवहन बँक शाखा मुंबई सेंट्रल कार्यालय येथे नेमणूक केली. परंतु, लाचेची १ लाख १० हजार रुपयांची उरलेली रक्कम तक्रारदार याने दिली नाही. त्यामुळे उर्वरित लाचेची रक्कम आणून देण्यासाठी राहुल पुजारी याने तगादा लावला आहे, अशी तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली आहे. या तक्रारीची पडताळणी केली.
त्यानंतर कोल्हापूर येथील रुहीकर कॉलनीतील बँक ऑफ बडोदा समोर रस्त्यावर सापळा रचला.
तक्रारदार याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुल पुजारी या बँक निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
शाहुपरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sirdeshpande) व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक विजय पवार (PI Vijay Pawar) अधिक तपास करीत आहेत. (ACB Trap On Bank Inspector)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed