Yerawada Pune Crime News | कनिष्ठ महिला सहकार्‍याने ‘त्याच्या’ गैरकृत्यात सामिल होण्यास ‘नकार’ देऊन कंपनीतील फसवणूक आणली उजेडात; बँकेच्या त्रुटीचा फायदा घेऊन 35 लाखांची फसवणूक

fraud

पुणे (विवेक भुसे) :- Yerawada Pune Crime News | बँकेच्या त्रुटीचा गैरफायदा घेऊन ‘त्याने’ वर्षभर कंपनीचे लाखो रुपये स्वत:च्या बँक खात्यात वळते करुन फसवणूक केली. त्यानंतर मुळ ओडिशा गावी पलायन केले. आपल्या कनिष्ठ महिला सहकारी हिला संपूर्ण गैरव्यवहार कसा करावा, याची माहिती दिली. तिला फसवणुकीत सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला. तिला अजून मोठ्या रक्कमेची फसवणुक करण्याची गळ घातली. परंतु, या महिलेने हे सर्व प्रकरण मॅनेजमेंटला सांगून या गैरव्यवहाराची माहिती कळविली. मॅनेजमेंटच्या सुचनेनुसार या महिलेने ‘त्याने’ कसा गैरव्यवहार केला याची माहिती व्हॉटसअ‍ॅप चॅटवर संभाषण करुन पुरावा गोळा करुन कंपनीला दिली. (Cheating Fraud Case)

जॉय अँड क्रु व्हेकेशन्स एल एल पी कंपनीची (Joy-N-Crew Vacations LLP) ३४ लाख ७१ हजार ७५७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी राकेश कुमार निरंजन पाणिग्रही Rakesh Kumar Niranjan Panigrahi (वय ३०, रा. सोरो, अनंतपुर, बालेश्वर, ओडिशा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जॉय अँड क्रु व्हेकेशन्स एल एल पी याकंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आशिष मुळे यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉय अँड क्रु व्हेकेशन्स एल एल पी या कंपनीमध्ये राकेश कुमार पाणिग्रही (रा. निवृत्ती हाईटस, साठेवाडी रोड) हा मॅनेजर अकाऊंटंटस आणि फायनान्स म्हणून २६ डिसेंबर २०२३ रोजी कामाला लागला. पहिले ३ महिने त्याने अकाऊंटसच्या सर्व व्यवहाराचे ज्ञान संपादित करुन घेतले. कंपनीच्या व्यवस्थापनाने पूर्ण विश्वासाने अकाऊंट डिपार्टमेंटची जबाबदारी राकेशकडे सुपूर्त केली. सर्व बँक खात्याचे सर्व ऑनलाईन व्यवहार जसे पैसे ट्रान्सफर करणे, बँक स्टेटमेंट काढणे, बॅलन्स चेक करणे, इत्यादी सर्व कामे राकेशवर सोपविली.

त्याला सर्व लॉग इन आयडी व पासवर्ड दिले. ओटीपी येणारा ऑफिसचा अकाऊंटस डिपार्टमेंटचा मोबाईल फोनही त्याला दिला़. १६ नोव्हेबर २०२४ पासून कंपनीचे अंतर्गत ऑडिट होणार होते. त्याच्या आदल्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२३ पासून वडिलांच्या अपघाताचे कारण देऊन ५० हजार रुपये पगार अ‍ॅडव्हान्स व विमानाचे तिकीट ऑफिसमधून घेऊन तो आपल्या मुळ गावी गेला. कंपनीचा लॅपटॉप व मोबाईल सीमकार्डही नेले. राकेश याला ओडिशा येथील मुळ गावी असताना त्याला पैशांची गरज लागल्याने त्याने त्याची कनिष्ठ सहकारी गौरी शिंदे (रा. आंबेगाव) यांना आपल्या गैरव्यवहारात समाविष्ठ करुन घेण्याचा प्रयत्न केला. तिने ही सर्व माहिती व्यवस्थापनाला दिली. व्यवस्थापनाच्या सुचनेनुसार गौरी शिंदे यांनी त्याच्याबरोबरील संभाषण व्हॉटसअप चॅटवर करुन याप्रकरणी पुरावे गोळा करत होती. त्यातून त्याने हा गैरव्यवहार कसा केला हे सांगितले.

राकेश याने बेनिफिशरी नावामध्ये कंपनीच्या विविध सेवा पुरवठादार (व्हेंडर) आणि कंपनीच्या प्रमोटरची नावे लिहून खाली स्वत:चा खाते क्रमांक व कोड टाकून पैसे स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतले आहेत. या व्यवहारात बँक फक्त खाते क्रमांक जुळल्यास पैसे ट्रान्सफर करते़ व बेनिफिशरी खात्याचे नाव वेगळे असले तरी पैसे नमूद केलेल्या खाते क्रमांकात जमा करते़. याच बँकेच्या त्रुटीचा राकेशने फायदा उठवून ही फसवणूक केली आहे. राकेश याने ना फक्त ही रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये वळवली तर त्याने या सर्व खोट्या अकाऊंट एट्रीज टॅली सॉफ्टवेअर मध्ये दाखवल्या आहेत.

तसेच राकेश याचा हेतू हा गैरव्यवहार पुढचे २ ते ३ माहिने गौरी शिंदे हिच्या संगनमताने करण्याचा प्रयत्न होता.
या व्यतिरिक्त कंपनीचे लेटर हेटस आणि स्टॅम्पस याचाही गैर वापर करण्याचा हेतू होता.
या सर्व बाबी राकेश याने गौरी शिंदे यांच्या व्हॉटसअ‍ॅप चॅटवर सांगितले आहे.
गौरी शिंदे यांनी हे सर्व पुरावे व्यवस्थापनाला दिले आहेत. गौरी शिंदे यांनी त्याच्या गैरव्यवहारात सामील होण्यास नकार
देऊन राकेश याची फसवणूकीची मोडस उघड करण्यात कंपनीला सहकार्य केले.
अंतर्गत ऑडिटमध्ये राकेश पाणिग्रही याने जॉय अँड क्रु व्हेकेशन्स एल एल पी या कंपनीच्या
खात्यातून २९ लाख १६ हजार ६७८ रुपये आणि कॅमेलिया इमि हॉलिडेज
या कंपनीमधून ५ लाख ५५ हजार ७९ रुपये अशी ३४ लाख ७१ हजार ७५७ रुपयांची फसवणूक करुन
आपल्या मुळ ओडिशा येथील गावी पळून गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dinesh Patil) तपास करीत आहेत. (Yerawada Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed