Chandrashekhar Bawankule On Civic Body Elections Maha | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार – चंद्रशेखर बावनकुळे
शिर्डी : Chandrashekhar Bawankule On Civic Body Elections Maha | विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी महायुतीकडून सुरु आहे. दरम्यान शिर्डी येथील भाजप प्रदेश अधिवेशनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
संघटनेच्या माध्यमातून पक्षाची बांधणी मजबूत करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करुन देण्याचा संकल्प अधिवेशनात केला जाईल. महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ दिली, आता नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी ताकद उभी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच महायुती म्हणूनच या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे सांगत निवडणुकीची तयारीही महायुतीकडून सुरु असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिर्डीतील अधिवेशन ऐतिहासिक आहे. विधानसभा निवडणूकीत जनतेने फडणवीस सरकार निवडून दिले. २३७ संख्याबळ असलेले हे सरकार निवडणून दिल्या बद्दल जनतेचे आम्ही आभार मानणार आहोत. कार्यकर्त्यांनेही या विजयात मोठे योगदान दिले, त्यांचेही आभार व्यक्त केले पाहीजे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मानही केला पाहीजे यासाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत तसेच या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संघटन मजबूत करुन दिड कोटी सदस्य संख्या आम्ही गाठणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, भाजपने श्रद्धा सबुरीचा संदेश स्वीकारून आपली वाटचाल केली आहे.
सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. मात्र यापूर्वी जनाधार डावलून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला साथ दिली.
त्यांच्या विजयाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसले. आता काही गोष्टी उशिरा त्यांच्या लक्षात आल्या आहेत.
अशी परिस्थिती असली तरी महाराष्ट्राचे राजकारण हे संस्कृती आणि संस्कार पाळून पुढे जाते.
मनात कटुता ठेवून चालत नाही”, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे. (Chandrashekhar Bawankule On Civic Body Elections)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका