Supriya Sule On Shivsena UBT | ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “निवडणुका सोयीने लढायला लागले तर…

Supriya Sule-Uddhav Thackeray (1)

मुंबई : Supriya Sule On Shivsena UBT | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे तिन्ही मुख्य पक्ष मविआ म्हणून निवडणूक लढणार की स्वबळाचा नारा देणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. “एकदा आम्हाला आजमावून पाहायचे आहे”, असे म्हणत महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे भाष्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. यानंतर मविआच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. (Civic Body Elections Maharashtra)

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले. अजून इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यांची बैठक बोलावण्याची जबाबदारी आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागच्या वेळी वेगवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सगळ्या निवडणुका आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी न्याय मिळणार?ही त्यांचीही निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ” जर वेगवेगळे लढले तर मविआतील तीनही पक्षांना त्याचा १०० टक्के फटका बसेल.
त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण आहोत? विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते. हा निर्णय फार घाईने घेतला.

कार्यकर्त्यांचे मत काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे, असे वाटत नाही. त्यांचा पक्ष आहे.
त्यांनी निर्णय घ्यावा. शेवटी ओढून कोणाला तरी सोबत घेऊन जाणे, हे आम्हाला पटणार नाही किंवा शोभणार नाही”,
असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या स्वबळावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed