Pune-Mumbai Expressway Missing Link | पुणे- मुंबईतील अंतर 6 किलोमीटरने कमी होणार, प्रवासाच्या वेळेत 25 मिनिटांची होणार बचत

Pune-Mumbai Expressway Missing Link

पुणे : Pune-Mumbai Expressway Missing Link | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर असलेले मिसिंग लिंकचे काम जूनमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे- मुंबईतील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत २५ मिनिटांची बचत होणार आहे. मात्र या मार्गावरील बोगद्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. बोगद्याला जोडणाऱ्या टायगर दरीतील ‘केबल स्टेड’ पुलाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूल जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मिसिंग लिंक चे काम दोन भागात सुरु आहे. बोगदा व केबल स्टड पूल असे दोन भागात विभागला आहे. सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या बोगद्यात अद्याप काही कामे अपूर्ण आहेत. बांधण्यात येणारा पूल १३२ मीटर उंचीचा आहे. हा पूल बांधून झाल्यावर मुंबई दरम्यान प्रवासादरम्यानचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल. त्यामुळे दोन शहरातील अंतर कमी होईल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत सुमारे २५ मिनिटांची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार ६९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

द्रुतगती मार्ग दोन विभागात पूर्ण होत आहे. सध्या द्रुतगती मार्गावर ६ लेन आहेत. त्याचे रुंदीकरण करून ८ लेनचा मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गावर दोन उड्डाणपूलदेखील बांधले जात आहेत. पैकी एक पूल केबल स्टेडचा आहे. यासाठी ८५० मीटर लांबीचा ‘व्हायडक्ट’चा वापर केला आहे. त्याच्या पायाभरणीचे काम झाले आहे. केबल स्टेड पुलाची लांबी जवळपास ६५० मीटर आहे. हा पूल जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर बांधला जात असल्याने देशातील इतर रस्ते प्रकल्पांमधील सर्वांत उंच पूल ठरणार आहे.

एमएसआरडीसी सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील म्हणाले, ” जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
काम पूर्ण होताच प्रवाशांसाठी मार्ग खुला केला जाईल. ” (Pune-Mumbai Expressway Missing Link)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed