Pune Crime Branch News | पुणे : हडपसर परिसरातून अफिमच्या बोड्यांचा चुरा मोठ्या प्रमाणावर जप्त; राजस्थानवरुन आणल्याचा संशय

Opium Powder

पुणे : Pune Crime Branch News | अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाकडून पोलिसांनी ८३ हजार रुपयांचा अफिम बोड्यांचा चुरा Opium (पॉपीस्ट्रा) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी Sumerlal Giridharlal Chaudhary (वय ३०, रा. बिग मार्ट शेजारी, चिंतामणीनगर, हडपसर, मुळ रा़ जोधपूर, राजस्थान) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट २ चे अधिकारी व अंमलदार हडपसर परिसरात गस्त घालत असताना ११ जानेवारी रोजी पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे व राहुल शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सय्यदनगर येथील चिंतामणीनगर येथे एक जण अंमली पदार्थ घेऊन येणार आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी चिंतामणीनगर येथे सापळा रचला. अ‍ॅक्टीवा दुचाकीवरुन आलेल्या सुमेरलाल चौधरी याला पकडले. त्याकडे ६१५ ग्रॅम प्रॉपीस्टा (अफिमच्या बोंड्याचा चुरा) मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील अंमली पदार्थ, दुचाकी व रोख रक्कम असा ८३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ,
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे, राहुल शिंदे, शंकर नेवसे, ओमकार कुंभार,
हनुमंत कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, अमोल सरडे, गणेश थोरात, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार,
साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed