Pune PMC News | सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ दिसणार, कचरा रात्रीच होणार ‘गायब’; पुणे महापालिका प्रशासनाचे नियोजन

Pune PMC Kachra

पुणे: Pune PMC News | शहर स्वच्छ असावे यासाठी रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन सुरु केले आहे. रात्रपाळीसाठी काम करणारे कर्मचारी, वाहने याबाबत पालिकेकडून तयारी सुरु आहे. एकीकडे बेशिस्त नागरिक आणि सकाळी कचरा उचलण्यास प्रशासनास उशीर होत असल्याने कचरा दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा पडल्याने घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. दरम्यान आता घाण आणि दुर्गंधीपासून त्यांची सुटका होणार आहे. सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगले वातावरण अनुभवता येणं शक्य होणार आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

पुणे शहरातील मंडई, तुळशीबाग, टिंबर मार्केट, खाऊगल्ल्या आणि महत्त्वाच्या बाजारपेठा या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. या परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे दुर्गंधी पसरते. नागरिकांना वारंवार कचरा करू नये, असे आवाहन केले जाते. यासाठी कारवाई देखील केली जाते. पण पुण्यात परिस्थिती जैसे थे असल्याचेच पाहायला मिळते. या कचऱ्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. अशात कचरा वेळेमध्ये उचलला जात नसल्यामुळे पुणे शहर घाण होत चालले आहे. यावर आता महानगर पालिकेने उपाय शोधून काढला आहे. रात्रीमध्येच पुणे शहर स्वच्छ होणार आहे.

पुणे महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन ८१ गाड्या उपलब्ध असणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार कचरा उचलण्यासाठीच्या गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेकडे जुन्या आणि नवीन अशा ३५१ घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा रात्रीच उचलण्यात यावा यासाठी प्रशासन योग्य नियोजन करत आहे.

घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम म्हणाले, “कचरा रात्री उचलला जावा यासाठी चालक आणि कर्मचारी यांची उपलब्धता येत्या आठवड्याभरात होईल.
यानंतर रात्रीच कचरा उचलण्यात येणार आहे. पुढील ८ दिवसांत याची अंमलबजावणी सुरु होईल.” (Pune PMC News)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed