Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’, निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा
नवी दिल्ली : Union Budget 2025 Updates | सरकार ‘पंतप्रधान धनधान्य योजना’ राज्य सरकारांसोबत राबवणार आहे. त्यात शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादने आणि शाश्वत विकास साध्य करणे, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाईल. यातून 1.7 कोटी शेतकर्यांना फायदा होईल. यात 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल, अशी घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.
आज सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात केली. करदात्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणती घोषणा होणार? इतर कोणत्या घोषणा होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभागृहात केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली होती.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, हा अर्थसंकल्प विकासदर वाढवणे, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणे या सरकारच्या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
- मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना राबवण्यात येईल. त्यातून 5 लाख महिलांना लाभ मिळू शकेल. या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल
- देशात 5. 7 कोटी लघुउद्योग असून त्यातून 7.5 कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार.
- बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार.
- भारताचा मत्स्य उत्पादनात जगभरात दुसरा क्रमांक लागतो. त्यात शाश्वत उत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी काम केले जाईल. अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरावर लक्ष केंद्रीत केले जाईल.
- तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिले जाणार. नाफेड, एनसीसीएफकडून डाळींची खरेदी केली जाईल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)
Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न