Union Budget 2025 | शेतकर्‍यांना स्वस्त व्याजदराने 5 लाख रूपयांचे कर्ज, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली, कापूस उत्पादकांना पॅकेज, निर्मला सीतारमण यांची घोषणा

Budget 2025

नवी दिल्ली : Union Budget 2025 | सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये केली आहे. स्वस्त व्याजदराने शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. यासोबतच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना 5 लाख रुपयांचे पॅकेजसुद्धा दिले जाईल, अशी घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्पीय भाषण करत असताना विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर सभागृहात अर्थमंत्र्यांचे भाषण सुरूच आहे. शेतकर्‍यांसाठी आतापर्यंत काही महत्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत.

अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

  • यूरिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने पूर्वेकडील भागात 3 बंद यूरिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यूरिया पुरवठा वाढविण्यासाठी आसामच्या नामरूपमध्ये 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमता असलेला प्रकल्प स्थापन केला आहे.
  • फुटवेयर आणि लेदर क्षेत्रासाठी फोकस प्रोडक्ट स्कीम सुरू केली जाईल. भारताच्या फुटवेयर आणि लेदर क्षेत्राची उत्पादन क्षमता, गुणवत्त आणि स्पर्धा वाढविण्यासाठी नॉन लेदर क्वालिटी फुटवेयरच्या उत्पादनाची यंत्रे, डिझाईन क्षमता, मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंना प्रोत्साहन दिले जाईल.
  • सर्व एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी गुंतवणूक आणि टर्नओव्हरची मर्यादा अनुक्रमे 2.5 आणि 2 पट वाढवली जाईल. यातून पुढे जाण्यास आणि तरूणांसाठी रोजगार निर्मिती करता आत्मविश्वास मिळेल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed