Shivsena UBT MP On Eknath Shinde | “एकनाथ शिंदेंचा फोन दिल्लीतून टॅपिंग”, शिवसेना खासदाराचा खळबळजनक दावा; म्हणाले – “फडणवीस एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत आहेत”

Eknath Shinde

मुंबई : Shivsena UBT MP On Eknath Shinde | राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आलं असलं तरी महायुतीत सर्वकाही आलबेल आहे असे चित्र दिसत नाही. सत्ता स्थापनेपासूनच एकनाथ शिंदेंची नाराजी लपून राहिलेली नाही. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन दिल्लीतून टॅप केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत, असे शिंदेंना खात्रीने वाटते. दिल्लीच्या एजन्सी त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे, अशी माहिती शिंदेंच्याच आमदाराने दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ” राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. मुख्यमंत्री फडणवीस आता एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत आहेत, कारण शिंदे यांच्याकडे सध्या काहीच उरलेले नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध आता जवळजवळ तुटले आहेत. परिणामी दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.”

ते पुढे म्हणाले, ” भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शिंदे यांच्या लोकांसोबत नियमित जनता दरबार घेण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारची अवस्था किती कमजोर आणि अनियंत्रित आहे, हे स्पष्ट होते. प्रशासन आणि जनतेच्या समस्यांकडे कुणाचं लक्ष नाही”, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. (Shivsena UBT MP On Eknath Shinde)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed