Anjali Damania On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या कथित कृषी घोटाळ्याने महायुती सरकार अडचणीत! अंजली दमानियांनी पुरावेच मांडले, म्हणाल्या – ‘आता राजीनामा घ्याच’

Anjali Damania-Dhananjay Munde

मुंबई : Anjali Damania On Dhananjay Munde | मस्साजोग, बीडचे सरपंच देशमुख यांच्या खूनप्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे दिवसेंदिवस अडचणीत येऊ लागले आहेत. पीकविमा घोटाळा, हार्वेस्टींग मशीन घोटाळ्याचे आरापे थंडवले नसतानाच, त्यांच्यावर आता कृषीमंत्री असताना केलेल्या घोटाळ्यांचे पुरावेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत आज मांडले. यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांमुळे एकुणच महायुती सरकार अडचणीत आले आहे.

कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंच्या काळात झालेल्या थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवताना दमानिया म्हणाल्या, एक कृषी मंत्री शेतकर्‍यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देते, त्या योजनांचा दुरूपयोग होत आहे, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

अंजली दमानिया यांनी उपस्थित पत्रकारांना काही उत्पादनांची मूळ किंमत ऑनलाईन दाखवून आरोप केले की, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाईड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. ही उत्पादने विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारले आहेत.

नॅनो यूरियाची 92 रुपयाची बॉटल 220 रूपयांना
अंजली दमानिया म्हणाल्या, ही उत्पादने इफको नावाच्या कंपनीची आहेत. नॅनो यूरियाचा 184 रुपये लिटर दर आहे. म्हणजे 500 मिलिलीटरच्या बॉटलला 92 रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले त्यामध्ये ही 92 रूपयांची बॉटल 220 रुपयात घेण्यात आली. मुंडे यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल प्रति 220 रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या असा आरोप दमानिया यांनी केला.

नॅनो डीएपीची 269 रुपयाची बॉटल 590 रूपयांना
तर नॅनो डीएपी खरेदीच्या कथित घोटाळ्याचा आरोप करताना अंजली दमानिया म्हणाल्या, नॅनो डीएपीची किंमत 522 रुपये लिटर आहे. म्हणजे 500 मिलिलीटरची बॉटल ही केवळ 269 रुपयाला मिळते. कृषी खात्याने 19 लाख 57 हजार 438 घेतल्या. त्याचा बाजार भाव 269 रुपये, पण कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला खरेदी केली. हे दोन्ही घोटाळे 88 कोटींचे आहेत.

बॅटरीची किंमत 2450, खरेदी केली 3426 रूपयांना
बॅटरी खरेदीच्या कथित घोटाळ्याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या, बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो 2450 रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर 2946 रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडरमध्ये 3426 रुपयाला ही बॅटरी विकत घेतली.

म्हणजे प्रत्येक बॅटरी स्पेअरवर एक हजाराच्यावर पैसे कमावले. डीबीटी योजनेत 5 लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरले होते. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ दिला गेला, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया यांनी आज केलेल्या गंभीर आरोपांनंतर महायुती सरकारकडून कोणते स्पष्टीकरण देण्यात येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed