Yerawada Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल विकत घेणाऱ्या दोघांच्या येरवडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या (Video)

पुणे : Yerawada Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल व जिवंत काडतुस विकत घेणार्या दोघांना येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) अटक केली आहे. प्रविण विकास कसबे Pravin Vikas Kasbe (वय २९, रा. आंबेगाव, कात्रज), प्रतिक दादासाहेब रणवरे Pratik Dadasaheb Ranware (वय २५, रा. सदगुरु रेसिडेन्सी, सिंहगड कॉलेजवळ, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आकाश उद्धव कोपनर Aakash Uddhav Kopner (रा. गोकुळनगर, कात्रज) या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अमोल अरुण गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pistol Seized)
https://www.instagram.com/reel/DFwq_AJJk0T/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कोपनर हा सराईत गुन्हेगार आहे. आकाश कोपनर याला गेल्या वर्षी बिबवेवाडी पोलिसांनी गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तसेच कोपनर याच्यावर लुटमार केल्याचा दौंड पोलीस ठाण्यात तर मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख यांना बातमी मिळाली की, वाडिया बंगल्याजवळ दोघे जण पिस्तुल विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजता येरवड्यातील वाडिया बंगल्याजवळ सापळा रचला. प्रविण कसबे व प्रतिक रणवरे हे तेथे आले असताना पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी केली आहे. (Yerawada Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा